Hard Facts : अमेरिकेत इव्हेंट्स करून मोदींचे काय चुकले??; अमेरिकन पप्पूला आपल्या बरोबरीचे स्थान दिले!!

अमेरिकेत इव्हेंट्स करून मोदींचे काय चुकले??, याचे एका वाक्यात उत्तर असे की अमेरिकन पप्पूला आपल्या बरोबरीचे स्थान दिले!!, असे म्हणायची वेळ अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या वक्तव्यातून, राजकीय निर्णयांमधून आणि त्याहीपेक्षा विदूषकी वर्तणुकीतून आली.

भारत आणि रशिया यांच्यातल्या तेल आणि शस्त्रांच्या व्यापारामुळे डोनाल्ड ट्रम्प संतापले. रशियाला थेट कुठली शिक्षा करता येत नाही म्हणून वड्याचे तेल वांग्यावर काढले. ते भारतावर रागावले. भारताला नष्टप्राय अर्थव्यवस्था म्हणाले. इतकेच नाही तर इराणशी व्यापार करणाऱ्या खासगी भारतीय कंपन्यांवर निर्बंध घातले. डोनाल्ड ट्रम्प यांचा अश्वमेधाचा घोडा मित्रांवरच उधळला. हे सगळे करताना त्यांनी आंतरराष्ट्रीय संकेतांमध्ये मान्य नसलेली अतिशय असभ्य भाषा वापरली.

त्यामुळे भारतातल्या आणि भारताबाहेरच्या मोदी विरोधकांना पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करायची संधी मिळाली. पंतप्रधान मोदींनी अमेरिकेतल्या ह्युस्टन मध्ये Howdy Modi कार्यक्रम घेतला. त्यानंतर अहमदाबाद मध्ये Namaste Trump कार्यक्रम घेतला हे दोन्ही कार्यक्रम मोठे political events मोदी आणि ट्रम्प या दोघांनीही या दोन्ही इव्हेंट्स आपापल्या निवडणुकांमध्ये चांगला वापर करून घेतला. त्याचा थोडाफार लाभ दोघांनाही झाला. या इव्हेंट्स मुळे दोन्ही देशांमधल्या विरोधकांच्या जखमांवर मीठ चोळले गेले. हे सगळे घडून जाऊन आता 5 वर्षे उलटली.

पण मोदींच्या तिसऱ्या आणि ट्रम्प यांच्या दुसऱ्या टर्ममध्ये अचानक ट्रम्प यांनी U turn घेतला आणि ते स्वैर आणि बेछूट वागायला लागले. पहिल्या टर्ममध्ये politically matured असलेले ट्रम्प दुसऱ्या टर्ममध्ये एवढे बिथरले की आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये कुठल्याही देशाचे संबंध खालीवर होत राहिले तरी भाषा मात्र सभ्य वापरायची असते. कोणालाही सभ्यतेची पातळी सोडून हिणवायचे नसते. होकार किंवा नकार देताना संयमीतच भाषा वापरायची असते हे राजकीय पथ्य ट्रम्प विसरले आणि ते धश्चोट सारखे भारतासारख्या मित्रावरच घसरले. या सगळ्यातून ट्रम्प यांनी अमेरिकेचे फार मोठे हित साधले वगैरे काही घडले नाही. उलट अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांना ट्रम्प यांच्या वक्तव्यावर सारवासारव करायला पुढे यावे लागले.



– नोबेल पुरस्कार मागितला

ट्रम्प यांची ही विदूषकी कमी पडली म्हणून की काय अमेरिकन वाईट हाऊस ने ट्रम्प यांनी गेल्या सहा महिन्यात केलेल्या कामगिरीचा पाढा वाचताना ट्रम्प यांनी भारत आणि पाकिस्तान यांच्यासह अन्य देशांची सहा युद्धे थांबवली असा दावा केला. तो दावा करण्या बरोबरच नोबेल पुरस्कारावरही हक्क ठोकला. अमेरिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच अमेरिकन अध्यक्षांच्या अधिकृत व्हाईट हाऊसच्या पत्रकांमधून नोबेल पुरस्काराची मागणी करण्यात आली. ही आणखी एक विदूषकी ट्रम्प यांच्या दुसऱ्या कारकीर्दीत घडली.

नमस्ते ट्रम्प - विकिपीडिया

– मोदी शिकले धडा

पण सगळ्यांमधून मोदींना मात्र चांगलाच धडा शिकावा लागला. आंतरराष्ट्रीय राजकारण केवळ इव्हेंट्स घडवून पुढे सरकू शकत नाही. आंतरराष्ट्रीय राजकारणातल्या Hard Facts वेगळ्या असतात. त्यातही अमेरिका, चीन यांच्यासारख्या देशांच्या Hard Facts आणखी वेगळ्या असतात, हे मोदींच्या लक्षात आले. किंबहुना हा मोदींसाठी मोठा धडा ठरला. अध्यक्षपदाच्या दुसऱ्या टर्ममध्ये डोनाल्ड ट्रम्प एवढे उधळतील आणि आंतरराष्ट्रीय संकेत, सभ्यता झुगारून भारताविरुद्ध वाट्टेल तशा दुगाण्या झोडतील याचा अंदाज मोदींनाच काय, पण बाकी कुठल्याही “चायना गुरूंना” देखील आला नव्हता. बाकी भारतातले नवे “चायना गुरु” लगेच ट्रम्प यांच्या पाठीशी उभे राहिले.

त्यामुळे मोदींचे मोठे इव्हेंट्स घडवून जर काही चुकले असेल, तर हेच चुकले की त्यांनी अमेरिकन पप्पूला आपल्या बरोबरीचे स्थान दिले. पण मोदी सुद्धा तिसऱ्या टर्ममध्ये यातून चांगला धडाही शिकले म्हणूनच ते ट्रम्प यांनी वॉशिंग्टनला बोलवून सुद्धा कॅनडातून तिथे गेले नाहीत. असीम मुनीर याच्याबरोबरचे diplomatic lunch त्यांनी खाल्ले नाही. ट्रम्प यांच्या f 35 विमानांच्या डीलला मान्यता दिली नाही. भारत आपल्या शेतकऱ्यांचे, व्यापाऱ्यांचे आणि नागरिकांचे हित जपल्याशिवाय राहणार नाही हे ट्रम्प प्रशासनाला ठणकावल्याशिवाय राहिले नाहीत. ट्रम्प यांच्या विदूषकी वर्तनातून मोदी लगेच धडा शिकले म्हणूनच तसे बजावू शकले. पण तरी इव्हेंट्स करून मोदींचे चुकलेच कारण त्यांनी अमेरिकन पप्पूला त्या इव्हेंट्स मध्ये आपल्या बरोबरीचे स्थान दिले होते!!

Modi made mistake by giving opportunity to American Pappu

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात