कोरोनाच्या हाताळणीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार अपयशी ठरत असल्याचा अपप्रचार विरोधकांकडून होत असला तरी लोकांनी मात्र वेगळे मत व्यक्त केले आहे. कोरोनाच्या परिस्थितीची चांगल्या पध्दतीने हाताळणी केली आहे. कोरोना लसीबाबतही मोदी सरकारचे काम चांगले आहे, असे एबीपी न्यूज- सी व्होटरच्या सर्वेक्षणातून म्हटले आहे. राहूल गांधी यांच्या नेतृत्वावर मात्र लोकांचा विश्वास नसल्याचही यातून समोर आले आहे.Modi is the most respected leader, proper handling of Corona situation, opposition’s propaganda about supply of Corona vaccine has no effect on people, ABP News-C Voter Survey
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : कोरोनाच्या हाताळणीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार अपयशी ठरत असल्याचा अपप्रचार विरोधकांकडून होत असला तरी लोकांनी मात्र वेगळे मत व्यक्त केले आहे. कोरोनाच्या परिस्थितीची चांगल्या पध्दतीने हाताळणी केली आहे.
कोरोना लसीबाबतही मोदी सरकारचे काम चांगले आहे, असे एबीपी न्यूज- सी व्होटरच्या सर्वेक्षणातून म्हटले आहे. राहूल गांधी यांच्या नेतृत्वावर मात्र लोकांचा विश्वास नसल्याचही यातून समोर आले आहे.
मोदी सरकारला दोन वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने सरकारबाबत लोकांना काय वाटते याचा शोध घेण्यात आला. शहरी क्षेत्रातील ६६ टक्के लोकांनी मोदींनी कोरोनाच्या संकटाशी चांगल्या पध्दतीने सामना केल्याचे म्हटले आहे.
अजूनही मोदीच या संकटावर चांगल्या पध्दतीने काम करण्यास सक्षम आहे. कोरोनाच्या दुसºया लाटेत केंद्र सरकारने विरोधकांचा दबाव असतानाही देशव्यापी लॉकडाऊनचा निर्णय घेतला नाही.
त्यावर ५७ टक्के लोकांनी सरकारच्या बाजुने मत दिले आहे. केवळ ३१ टक्के लोकांनी लॉकडाऊन लावण्याची गरज होती असे म्हटले आहे.कोरोना प्रतिबंधक लसीवरून विरोधकांकडून देशभर रान पेटविले जात आहे.
मात्र, लोकांना मात्र त्याच्यावर विश्वास नसल्याचे सर्वेक्षणात स्पष्ट झाले आहे. ५१ टक्केंहून जास्त लोकांनी मोदी सरकारने लसीकरण मोहीम चांगल्या पध्दतीने राबविली असल्याचे म्हटले आहे.मोदी सरकारने लसमैत्री हा उपक्रम राबवित अनेक गरीब देशांना लस पुरविली होती.
त्यावरूनही काहूर माजविण्यात येत आहे. देशातील ५४ टक्के लोकांनी मोदी सरकारचा हा निर्णय योग्यच होता असे म्हटले आहे. केवळ २९ टक्के लोकांनीच त्याला विरोध केला आहे.
शेतकरी आंदोलनाच्या निमित्तानेही सरकारविरोधातील वातावरण पेटविण्याचा प्रयत्न करण्यात आला. शेतकरी आंदोलन सरकारने चांगल्या पध्दतीने हटविले नाही असा आरोप करण्यात येत आहे. मात्र, लोकांचे मत मात्र वेगळे आहे.
शहरी क्षेत्रातील केवळ २० टक्के लोकांनाच वाटते की या आघाडीवर सरकार अपयशी ठरली. इतरांनी आंदोलन चांगल्या पध्दतीने हाताळल्याचे म्हटले आहे.राजधानी नवी दिल्लीतील नवीन संसद भवन असलेल्या सेंट्रल व्हिस्टाच्या कामावरूनही सरकारवर टीका करण्यात येत आहे.
मात्र, कोरोनाच्या काळात पायाभूत सुविधा उभारल्यास देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी मदतच होईल, असे सरकारचे म्हणणे आहे. सरकारचा सेंट्रल व्हिस्टा उभारणीचा निर्णय योग्य असल्याचे ४८ टक्के लोकांचे म्हणणे आहे. केवळ २९ टक्के लोकांनीच हा निर्णय योग्य नसल्याचे म्हटले आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App