
वृत्तसंस्था
अनंतनाग : जम्मू काश्मीर मधल्या प्रस्थापित नेत्यांमध्ये मुघली धर्मांध मानसिकता कशी रुतून बसली आहे, याचेच उदाहरण आज राज्याच्या माजी मुख्यमंत्री आणि पीडीपीच्या नेते मेहबूबा मुक्ती यांनी दाखवून दिले. त्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच धमकी देऊन टाकली आहे. Modi, if you have the courage, make the Taj Mahal, the Red Fort a temple again
मोदींमध्ये दम असेल तर त्यांनी ताजमहाल, लाल किल्ल्याला त्यांनी पुन्हा मंदिर बनवून दाखवावे. मग पाहू किती परकीय पर्यटक या देशात वास्तू पाहायला येतात ते… मुघलांच्या वास्तूंवर हे तुटून पडत आहेत. पण त्याचा काही उपयोग होणार नाही, असे धमकी भरले वक्तव्य मेहबूबा मुफ्ती यांनी पंतप्रधान मोदी यांना उद्देशून केले आहे. मुघलांच्या काळात बनलेल्या वास्तु बिघडवण्याचे काम भाजपचे सरकार करत आहे. त्यांना हिंदू आणि मुसलमान यांमध्ये फूट पाडून राज्य करायचे आहे, असा आरोपही मेहबूबा मुफ्ती यांनी केला आहे.
इतकेच नाही तर ताज महाल अथवा लाल किल्ला यांना यांचे स्वरूप बदलून त्यांचे मंदिर केले तर हा देश पाहायला किती परकीय पर्यटक भारतात येतील??, असा दर्पयुक्त सवाल देखील मेहबूबा मुफ्ती यांनी केला आहे.
जणू काही फक्त ताजमहाल आणि लाल किल्ला हीच भारताची ओळख आहे. मुघलांच्या काळात बांधलेल्या वास्तुंखेरीज दुसरी कोणतीच ऐतिहासिक वास्तु भारतात नाही!!, अशा थाटात मेहबूबा मुफ्ती यांनी पंतप्रधान मोदींना आव्हान दिले आहे.
याच त्या मेहबूबा मुफ्ती आहेत, की ज्यांनी 2019 च्या निवडणूक प्रचारात पंतप्रधान मोदींना हिंमत असेल तर 370कलम हटवून दाखवा, असे आव्हान दिले होते. परंतु मोदींनी 2019 लोकसभा निवडणूक जिंकल्यानंतर संसदेच्या पहिल्याच अधिवेशनात जम्मू कश्मीर राज्यातून 370कलम हटवण्याचा निर्णय घेतला. आता मुघली मानसिकतेतून मेहबूबा मुफ्ती यांनी मोदींना पुन्हा एकदा आव्हान दिले आहे. त्याचे प्रत्युत्तर ते कसे देतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
Modi, if you have the courage, make the Taj Mahal, the Red Fort a temple again
महत्वाच्या बातम्या
- NFHS Survey : स्री – पुरुष समानतेच्या दिशेने; 82% महिला पतीला सेक्ससाठी थेट नकार देऊ शकतात, तर 66% पुरुष म्हणतात, “इट्स ओके”!!
- ताजमहाल शिवमंदिरच, बंद २२ खोल्यांत हिंदू मूर्ती आणि धर्मग्रंथ, उघडण्यासाठी न्यायालयात याचिका
- १० मे आणि १८५७ चं स्वातंत्र्य समर!
- Census : देशात पहिल्यांदाच ऑनलाईन जनगणना; लाभ पोहोचवण्यातही अचूकता; अमित शहांची घोषणा!!