उसाची एफआरपी वाढवण्याच्या निर्णयाचा फायदा ५ कोटी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना होणार
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : खरीप पिकांच्या एमएसपीमध्ये वाढ केल्यानंतर मोदी सरकारने ऊस उत्पादक शेतकऱ्यांनाही मोठी भेट दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोदी सरकारने पुढील हंगामासाठी उसाच्या रास्त आणि किफायतशीर भावात अर्थात एफआरपी मध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. Modi governments gift to sugarcane farmers FRP increased for new sugarcane season
मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहार समितीने 2023-24 हंगामासाठी उसाच्या एफआरपीमध्ये प्रति क्विंटल 10 रुपयांची वाढ जाहीर केली आहे. उसाची नवीन एफआरपी आता ३१५ रुपये प्रतिक्विंटल झाली आहे. उसाची एफआरपी वाढवण्याच्या मोदी सरकारच्या निर्णयाचा फायदा ५ कोटी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना होणार आहे. यासोबतच ऊस कारखान्यांमध्ये काम करणाऱ्या ५ लाख कर्मचाऱ्यांना आणि संबंधित कामगरांनाही या निर्णयाचा फायदा होणार आहे.
मंत्रिमंडळ बैठकीत झालेल्या निर्णयांची माहिती देताना माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले की, मोदी सरकारने ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी उसाच्या एफआरपीमध्ये प्रति क्विंटल 10 रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. उसावर एफआरपी अर्थात वाजवी आणि योग्य किंमत ठरवून, ऊस उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाची हमी रक्कम दिली जाते.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App