मोदी सरकारचा निर्णय – आता ‘AIIMS’ मध्ये कर्करोग आणि मधुमेहाची ३५९ प्रकारची औषधी मिळणार मोफत!

AIIMS Students Association Issues Apology After Video Of Controvercial Remarks On Dussehra Went Viral

आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील रुग्णांना मोठा दिलासा देण्यासाठी सरकारचे हे पाऊल आहे.

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : कॅन्सर आणि मधुमेहासह अनेक आजारांनी ग्रासलेल्या लोकांना केंद्र सरकार मोठा दिलासा देणार आहे. दिल्लीस्थित ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स) मध्ये उपचार घेत असलेल्या लोकांसाठीच्या  मोफत औषधांच्या (एम्स फ्री मेडिसिन्स) यादीत सरकारने ६३ अतिरिक्त औषधांचा समावेश केला आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील रुग्णांना मोठा दिलासा देण्यासाठी सरकारचे हे पाऊल आहे. Modi governments decision  now 359 types of medicines for cancer and diabetes will be available free in AIIMS

एम्स प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, जेनेरिक फार्मसीची यादी वाढवण्यात आली आहे. यामध्ये कर्करोग, संधिवात, मधुमेह यासह अनेक आजारांच्या औषधांचा समावेश असून त्यासाठी ३५९ प्रकारची औषधे मोफत दिली जाणार आहेत.

याशिवाय कॅन्सरची महागडी औषधे पालबोसीक्लिब, दसाटिनिब, मेथोट्रेक्झेटही मोफत दिली जाणार आहेत. या निर्णयानंतर उपचारासाठी येणाऱ्या हजारो गरीब रुग्णांना दिलासा मिळणार असल्याचे एम्सचे संचालक डॉ.  एम. श्रीनिवास यांनी सांगितले.

दुसरीकडे, रुग्णांसोबत असलेल्या अटेंडंटमुळे एम्समध्ये गर्दी होऊ नये यासाठीही निर्णय घेण्यात आला आहे. एम्सचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजीव ललवाणी यांनी ओपीडी, लॅब, वॉर्ड आणि इतर ठिकाणी रुग्णासह एकच अटेंडंटला प्रवेश दिला जाईल, असा आदेश जारी केला आहे. मात्र, हा नियम दिव्यांग, वृद्ध आणि लहान मुलांना लागू होणार नाही. याशिवाय रुग्णांना भेटण्यासाठी येणाऱ्या लोकांना दुपारी ४ ते ६ या वेळेतच परवानगी असणार आहे.

Modi governments decision  now 359 types of medicines for cancer and diabetes will be available free in AIIMS

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात