ब्रिटन, अमेरिका आणि कॅनडाकडे सोपवली यादी
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : भारत सरकारने खलिस्तानी दहशतवाद्यांविरोधात कारवाई सुरू केली आहे. कॅनडात बसलेले दहशतवादी भारतीय दूतावासाला लक्ष्य करण्याचा सातत्याने प्रयत्न करत आहेत. या पार्श्वभूमीवर परदेशात राहून भारतीय संस्थांना नुकसान पोहोचवणाऱ्या आणि भारताविरोधात प्रचार करणाऱ्यांचे ओआयसी कार्ड रद्द केली जातील, असे स्पष्ट करण्यात आले आहे. Modi governments action against traitors begins NIA prepared a list of 19 Khalistani
कॅनडा आणि भारतातील वाढत्या तणावादरम्यान मोदी सरकारने परदेशी भूमीवर राहून देशाविरुद्ध कट रचणाऱ्यांना आणखी एक कडक संदेश दिला आहे. भारत मोठ्या कारवाईच्या मूडमध्ये असून एनआयएने तयार केलेली १९ दहशतवाद्यांची यादी ब्रिटन, अमेरिका आणि कॅनडाकडे सोपवली आहे. या लोकांनी तिथे बसून भारतविरोधी प्रचार केला तर खपवून घेतला जाणार नाही, त्यांचे ओआयसी कार्ड आणि पासपोर्ट रद्द केले जातील, असा कडक संदेश यात आहे.
सध्या याची पुष्टी झालेली नाही पण सूत्रांकडून आलेली बातमी खरी मानली तर भारताच्या बाजूने ही मोठी कारवाई असेल. अलीकडेच कॅनेडियन लोकांसाठी व्हिसा सेवा रद्द केल्यानंतर खलिस्तानी दहशतवाद्यांविरोधात उचललेले हे दुसरे कठोर पाऊल आहे. या अंतर्गत परदेशातील भारतीय संस्था, वाणिज्य दूतावास आणि दूतावासांवर झालेल्या हल्ल्यानंतर भारत आंदोलकांचे पासपोर्ट रद्द करू शकतो, असे सांगण्यात येत आहे. त्याचे ओव्हरसीज सिटिझन ऑफ इंडिया कार्डही रद्द केले जाऊ शकते.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रीय तपास संस्थेने खलिस्तानी दहशतवाद्यांची नवी यादी जाहीर केली आहे. यामध्ये एकूण १९ नावे आहेत. ज्यामध्ये ब्रिटनमधील ७ आणि अमेरिकेतील ५ खलिस्तानींचा समावेश आहे. हे ते १९ आहेत जे परदेशात राहून भारतविरोधी प्रचाराला खतपाणी घालत आहेत. २३ सप्टेंबर रोजीच सिख फॉर जस्टिसचे प्रमुख गुरपतवंत सिंग पन्नू यांची भारतात मालमत्ता जप्त करण्यात आली होती. त्यानंतर ही नवी यादी जाहीर करण्यात आली आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App