वृत्तसंस्था
लखनौ : पंतप्रधान नरेंद्र मोदी व उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याविरुद्ध आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहाद-उल-मुसलीमीन पक्षाचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Modi files case against Asaduddin Owaisi for making offensive statements about Yogi
नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून देशाचा धर्मनिरपेक्ष ढाचा उद्ध्वस्त करून हिंदू राष्ट्र बनविण्याचे प्रयत्न केले जात असल्याचा आरोप ओवेसी यांनी केला होता.
कटरा चंदना येथे आयोजित केलेल्या पक्षाच्या रॅलीत मोठी गर्दी झाली होती. त्याचप्रमाणे, असदुद्दीन ओवेसी यांनी मास्क घातला नव्हता तसेच सोशल डिस्टन्सिंगचेही पालन केले नाही, अशी माहिती बाराबंकीच्या पोलीस अधीक्षकांनी दिली.
आपल्या भाषणात त्यांनी सुमारे १०० वर्षांपूर्वीची राम सनेही घाट मशीद प्रशासनाने उद्ध्वस्त केली. तसेच मशीदीचा ढिगाराही काढला, असे आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. ते वस्तुस्थितीच्या विपरित आहे.
ही मशीद बाराबंकीच्या उपविभागीय दंडाधिकाऱ्यांच्या निवासस्थानासमोर होती. ही मशीद बेकायदेशीर असल्याचा निर्णय देत उपविभागीय दंडाधिकारी आदर्श सिंह यांच्या आदेशानुसार ती पाडण्यात आली, असा खुलासाही पोलिस अधीक्षकांनी केला.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App