विशेष प्रतिनिधी
नाशिक : मालेगाव मध्ये पोलीस आणि स्पेशल इन्वेस्टीगेशन टीमने बांगलादेशी नागरिकांना शोधून काढायची धडक मोहीम सुरू केल्याबरोबर मालेगाव शहरचे आमदार मौलाना मुक्ती इस्माईल यांना “राजकीय पोटदुखी” जडली. त्यांनी भाजपचे नेते किरीट सोमय्या यांच्यावर तोफा डागत अप्रत्यक्षपणे पोलिसांनाच कटघऱ्यात उभे केले. Maulana Mufti Ismail
सध्या मालेगाव मध्ये बांगलादेशी नागरिक शोधून काढून त्यांना परत त्यांच्या देशात पाठवण्याची धडक मोहीम पोलीस आणि स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीमने हाती घेतली आहे. मालेगावात घरोघर जाऊन जन्म दाखले तपासणी सुरू आहे. त्यातून बऱ्याच अवैध गोष्टी आणि धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले आहेत. पोलिसांनी त्याची माहिती अद्याप जाहीर केलेल्या नाहीत. परंतु कारवाई देखील थांबवलेली नाही. उलट ती कारवाई आता आणखी वेगात सुरू आहे.
पोलिसांच्या धडक कारवाईमुळे मालेगाव शहरचे आमदार मौलाना मुफ्ती इस्माईल राजकीय दृष्ट्या अस्वस्थ झाले. परंतु, सरकारने बांगलादेशी नागरिकांविरुद्ध सुरू केलेल्या कठोर कारवाईच्या विरोधात त्यांना थेट काही बोलता आले नाही. त्यामुळे त्यांनी भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांना टार्गेट केले.
किरीट सोमय्या यांना ठाई ठाई बांगलादेशी नागरिक दिसतात. मालेगावात कोणी बांगलादेशी नागरिक राहत नाहीत. मालेगाव अत्यंत सुसंस्कृत शहर आहे. त्याची प्रतिमा जपायचे काम आम्ही करतो. परंतु किरीट सोमय्या मालेगावची बदनामी करत सुटले आहेत. त्यांना माजी आमदार असिफ शेख साथ देत आहेत, असा आरोप मौलाना मुफ्ती इस्माईल यांनी केला. मालेगावात पोलिसांना अजून बांगलादेशी नागरिक असल्याचे पुरावे आढळले नसल्याचा दावाही मौलाना मुफ्ती इस्माईल यांनी केला.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App