अरविंद केजरीवालांमध्ये हिंमत असेल तर त्यांनी INDI आघाडी सोडल्याचे जाहीर करावे; काँग्रेस नेत्या अलका लांबांचे आव्हान!!

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्यावर छुपे वार करण्यापेक्षा अरविंद केजरीवाल यांच्यामध्ये हिंमत असेल, तर त्यांनी काँग्रेस प्रणित INDI आघाडी सोडल्याचे जाहीर करून दाखवावे, असे आव्हान काँग्रेसच्या नेत्या अलका लांबा यांनी केजरीवाल यांना दिले.

दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि आम आदमी पार्टी यांच्यात तुंबळ राजकीय युद्ध माजले असताना अलका लांबा यांच्यासारख्या वरिष्ठ नेत्याने केजरीवालांना थेट INDI आघाडी सोडण्याचे आव्हान दिल्याने दिल्ली सकट केंद्रातल्या राजकारणामध्ये देखील खळबळ निर्माण झाली आहे.

काँग्रेस पक्षाकडे 100 खासदार आहेत. लोकसभेत काँग्रेस मजबुतीने उभी आहे पण अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीतल्या 7 खासदारांची “भेट” भाजपला स्वतःच्या हाताने दिली. केजरीवाल काँग्रेसकडे दिल्लीत लोकसभा निवडणुकीत युती करण्यासाठी भीक मागत होते पण काँग्रेसने त्यांच्याशी युती करायची चूक केली. त्यामुळे दिल्लीत काँग्रेसला मोठा फटका बसला. आता केजरीवाल काँग्रेस नेत्यांवर वाटेल ते आरोप करत सुटले आहेत पण दिल्लीतल्या जनतेला सत्य कळून चुकले आहे, असे शरसंधान अलका लांबा यांनी साधले.

Congress candidate from Kalkaji assembly constituency, Alka Lamba says

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात