Mission Oxygen : संकटाच्या या काळात ऑक्सिजन वाहून नेणाऱ्या वाहनांना कोणताही अडथळा येऊ नये, यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने एक मोठा निर्णय घेतला आहे. एनएचएआयने म्हटले आहे की, ज्या टँकर व कंटेनरद्वारे ऑक्सिजन पुरविला जाईल त्यांना टोल भरावा लागणार नाही. ही सवलत सध्या दोन महिन्यांसाठी देण्यात आली आहे. Mission Oxygen NHAI exempts toll tax for tankers and containers carrying oxygen
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : संकटाच्या या काळात ऑक्सिजन वाहून नेणाऱ्या वाहनांना कोणताही अडथळा येऊ नये, यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने एक मोठा निर्णय घेतला आहे. एनएचएआयने म्हटले आहे की, ज्या टँकर व कंटेनरद्वारे ऑक्सिजन पुरविला जाईल त्यांना टोल भरावा लागणार नाही. ही सवलत सध्या दोन महिन्यांसाठी देण्यात आली आहे.
देशात ऑक्सिजनची मोठी कमतरता असून संपूर्ण यंत्रणा या कामात गुंतलेली आहे. कॉर्पोरेट क्षेत्र लिक्विड ऑक्सिजनच्या वाहतुकीसाठी क्रायोजेनिकची आयात करत आहे आणि दुसरीकडे वैद्यकीय वापरासाठी ऑक्सिजनदेखील तयार करत आहे. टाटा, अंबानी, अदानी, जिंदाल, सेल, भेल यांच्यासह डझनभर कंपन्यांचा या यादीत समावेश आहे. विशेषत: स्टील कंपन्या जोरदारपणे या कामात मदत करत आहेत. ऑक्सिजनची कमतरता दूर करण्यासाठी सरकार सतत प्रयत्न करत आहे.
ऑक्सिजन व ऑक्सिजन उत्पादित करणाऱ्या उपकरणांच्या आयातीवर सरकारने कस्टम ड्युटी व आरोग्य उपकर माफ केले आहेत. त्याशिवाय कस्टम विभागाला असेही निर्देश आहेत की, ऑक्सिजन उपकरणे किंवा कोरोनाविरुद्ध उपचारांशी संबंधित वस्तू ज्या जहाजात असतील त्यांना प्राधान्य आधारावर मंजुरी मिळावी. आयजीएसटीलाही परदेशातून मोफत वितरण म्हणून येणाऱ्या मदतीवर सूट देण्यात आली आहे. लोकांना वैयक्तिकरीत्या परदेशातून ऑक्सिजन संयत्रे आयात करण्याची परवानगी आधीच देण्यात आलेली आहे. एकूणच सरकार प्रत्येक क्षेत्रात ऑक्सिजनचा पुरवठा सुनिश्चित करण्यात गुंतलेली आहे.
याशिवाय ऑक्सिजन संकटाचा सामना करण्यासाठी पीएम केअर्स फंडचा वापरही केला जात आहे. या निधीतून एक लाख पोर्टेबल ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स खरेदी केली जातील, अशी बातमी नुकतीच आली होती. यासह पीएम केअर्स फंडाच्या पैशांचा वापर 500 नवीन प्रेशर स्विंग अॅब्झॉर्प्शन (पीएसए) ऑक्सिजन प्लांट स्थापित करण्यासाठी केला जाईल.
Mission Oxygen NHAI exempts toll tax for tankers and containers carrying oxygen
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App