इंजिनिअरींगचा चमत्कार, काश्मीर- लडाखला जोडणाऱ्या जोजिल बोगद्याचे 5 किलोमीटरचे काम पूर्ण

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : काश्मीर आणि लडाख यांना जोडणाऱ्या 18 किलोमीटर लांब सर्व हवामानात सुरू राहणाऱ्या जोजिला बोगद्याचं 5 किलोमीटर लांबीचे काम पूर्ण झाले आहे. श्रीनगर आणि लडाख जोडणारा केंद्र सरकारचा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे.Miracle of Engineering, 5 km of Jozil tunnel connecting Kashmir-Ladakh completed

जोजिला बोगदा नीलग्रार 1, 2 आणि जोजिला मुख्य बोगद्याला समुद्रसपाटीपासून 3 हजार 528 मीटर उंचीवर आहे. बर्फवृष्टी आणि अन्य प्रतिकूल वातावरणातही या बोगद्यातू प्रवास करता येणार आहे. आशिया खंडातील सर्वात मोठा जोजिला बोगदा युद्धजन्य स्थितीतही महत्वाचा ठरणार आहे.



जोजिला बोगद्याचे प्रकल्प प्रमुख हरपाल सिंह यांनी सांगितलं की, आमच्या मेघा इंजिनिअरींग लिमीटेडच्या टीमने कठीण परिस्थितीतही समर्पण आणि मोठ्या मेहनतीने हा प्रकल्प पूर्णत्वास नेला आहे.या प्रकल्पात एकूण 3 बोगदे, 4 पूल, बफार्पासून संरक्षण देणारी यंत्रणा, छोते पूल, कॅच डॅम, डिफ्लेक्टर डॅम कट अ‍ॅन्ड कव्हर टनेल आणि असे अनेक इंजिनिअरिंग जादुई प्रयोग पाहायला मिळतात.

जोजिला बोगदा प्रकल्प जम्मू-काश्मीर आणि लडाखच्या सामाजिक, आ क स्थिती, परिवहन आणि पर्यटनात मोठी सुधारणा करणारा ठरेल, असे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले.

मेघा इंजिनिअरींगकडे 1 ऑक्टोबर 2022 रोजी काश्मीर खोरे आणि लडाखला जोडणारा ऑल-वेदर कनेक्टिव्हिटी प्रकल्प देण्यात आला होता. या प्रकल्पाची एकूण लांबी 32 किलोमीटर आहे आणि या दोन भागात विभागला गेला आहे. या प्रकल्पाच्या 18 किलोमीटर भागात सोनमर्ग आणि तलतालला जोडतो.

यात मुख्य पूल आणि दोन बोगदे आहेत. टनेल टी 1 मध्ये दोन ट्यूब लावण्याची योजना आहे. हिमालयातून बोगदा निर्मितीचं काम खूप कठीण आहे. मात्र, एमईआयएलने एका विशिष्ट वेळेत सुरक्षा, गुणवत्ता आणि वेग या सर्वोच्च मानांकनाने दोन्ही बोगदे तयार केले आहेत.

Miracle of Engineering, 5 km of Jozil tunnel connecting Kashmir-Ladakh completed

महत्त्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात
    Icon News Hub