विशेष प्रतिनिधी
पाटणा : महाराष्ट्र आणि अन्य राज्यांत यश मिळाल्यावर राष्ट्रद्रोही प्रचार करणाऱ्या असदुद्दीन ओवैसी यांच्या ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (एआइएमआइएम) या पक्षाच्या आमदाराने वंदे मातरम गाण्यास नकार दिला आहे. इस्लामिक मानसिकता असणारे हे लोक भारताची फाळणी करू पाहत आहेत, असा आरोप भाजपाने केला आहे.MIM’s anti-national propaganda in Bihar too, Asuddin Owaisi’s MLAs refuse to sing Vande Mataram
बिहार विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाची सुरूवात झाली. अधिवेशनात वंदे मातरमला सुरूवात झाल्यावर एमआयएमचे आमदार अख्तरुल ईमान यांनी त्याचा विरोध केला. भाजपाचे आमदार हरि भूषण ठाकुर बचौल यांनी ईमान यांचे कृत्य देशद्रोही असल्याचा आरापे केला.
त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी विधानसभा अध्यक्षांकडे केली. विधानसभेचे अधिवेशन सुरू झाल्यावर आमदार ईमान यांना सभागृहात थांबू दिले जाणार नाही, असा इशारा बचौल यांनी दिला आहे.माध्यमांशी बोलताना आमदार ईमान म्हणाले, राष्ट्रगीत वंदे मातरमची परंपरा बिहार विधानसभेत थोपली जात आहे.
मला वंदे मातरम गाण्यास भाग पाडण्याची कोणाचीही हिंमत नाही. घटनेमध्ये राष्ट्रगीत गायला पाहिजे असे कोठेही लिहिलेले नाही. देशातीील सर्व वर्गांना एकाच नजरेने पाहणे चुकीचे आहे. मी कधीही वंदे मातरम गात नाही आणि भविष्यातही गाणार नाही.
आमदार बचौल म्हणाले, भारतात राहणारे आणि येथेच खाणारे हे लोक राष्ट्रगीत गायला नकार देतात. या लोकांची मानसिकताच जिहादी आहे. इस्लामिक मानसिकता असलेले हे लोक भारताची फाळणी करू पाहत आहेत. त्यामुळे विधानसभा अध्यक्षांनी त्यांच्यावर कारवाई करायलाच हवी.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App