विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : संसदेत आपल्याच काँग्रेसी आणि कम्युनिस्ट अनुयायांनी केलेल्या घुसखोरीचे राजकीय भांडवल करत स्वतःवरच निलंबनाचा बडगा उगारून घेणाऱ्या विरोधी खासदारांचे वर्तन आज आणखी रसातळाला गेले. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूळ काँग्रेसचे निलंबित खासदार कल्याण बॅनर्जी यांनी संसदेच्या पायऱ्यांवरच उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे अध्यक्ष जगदीप धनखड यांची मिमिक्री केली. त्यापुढे जाऊन राहुल गांधींनी त्याचा व्हिडिओ बनवून उपराष्ट्रपतींची खिल्ली उडवली. Mimicry of Vice President by MP Kalyan Banerjee
बेरोजगारीच्या नावाखाली काँग्रेस आणि कम्युनिस्ट विचारसरणीच्या युवकांनी संसदेत घुसखोरी केली. त्या मुद्द्यावरून सरकारला घेत सर्व विरोधी खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्याच निवेदनाचा हट्ट धरून संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये प्रचंड गदारोळ केला. संसदेचे कामकाज चालू दिले नाही. आपल्या नियमबाह्य वर्तणुकीतून स्वतःवरच निलंबनाची कारवाई ओढवून घेतली. लोकसभा आणि राज्यसभा मिळून 100 खासदारांचे निलंबन झाले.
पण या निलंबनानंतरही खासदारांच्या वर्तणुकीत कुठलीही सुधारणा दिसली नाही उलट संसदेच्या पायऱ्यांवर उभे राहून उपराष्ट्रपती म्हणजेच राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष जगदीप धनखड यांची मिमिक्री करण्यापर्यंत या खासदारांच्या वर्तणुकीचा स्तर घसरला. उपराष्ट्रपती राज्यसभेचे कामकाज कसे चालवतात, ते कसे वाकून उभे राहतात, सदस्यांना उद्देशून काय बोलतात, सदस्यांनी पॉईंट ऑफ ऑर्डर उपस्थित केल्यावर कशी रिएक्शन देतात, आपण खूप उंच आहोत पण वाकून उभे राहतो हे कसे सांगतात, अशी सगळी मिमिक्री ममता बॅनर्जींचे तृणमूळ काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी केली. त्यावेळी अनेक खासदार त्यांच्या भोवती संसदेच्या पायऱ्यांवर बसून खिदळत होते. राहुल गांधी आणि के. सी. वेणुगोपाल समोर उभे राहून उपराष्ट्रपतींचा अपमान पाहत होते. पण हा अपमान नुसता पाहूनच ते थांबले नाहीत, तर राहुल गांधींनी आपल्या मोबाईल मधून त्या मिमिक्रीचा व्हिडिओही काढला.
या सर्व प्रसंगाचा उपराष्ट्रपतींनी राज्यसभेत उल्लेख करून त्याचा तीव्र निषेध केला. सोशल मीडियावर देखील या प्रकाराचा प्रचंड निषेध होत असून आपणच निवडून दिलेले खासदार काय लायकीचे वर्तन करतात??, हे पाहून संताप येतो, अशा प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटल्या आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App