विशेष प्रतिनिधी
लखनऊ : जर मुस्लिमांना जास्त मुलं होणार नाहीत, तर मग आपला समाज भारतावर राज्य कसा करणार? आपली संख्या जास्त नसेल तर असदुद्दीन ओवेसी साहेब पंतप्रधान कसे होतील, शौकत अली साहेब उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री कसे होतील, असे वक्तव्य एमआयएमच्या एका नेत्याने केले आहे.MIM leader says how can Muslims rule India if they don’t have more children?
एमआयएम अलीगडचे जिल्हाध्यक्ष गुफरान नूर यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. ज्यामध्ये ते असदुद्दीन ओवेसी यांना पंतप्रधान बनवायचे असल्यास मुस्लिमांना आणखी मुले जन्माला घालावी लागतील, असे म्हणताना दिसत आहेत.
गुफरान नूर म्हणतात की, दलित, मुस्लिमांना मुलं जन्माला घालण्यापासून रोखण्यासाठी धमकावले जात आहे. आम्ही का मुलं जन्माला घालू नयेत? हे आमच्या शरियतच्या विरोधात आह.दरम्यान, हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर, नूर यांनी स्पष्टीकरण देत म्हणाले,
जेवढा सहभाग आम्ही बलिदानात दिलाय, आमचा तेवढा सहभाग मुलं जन्माला घालण्यात नाही. ओवेसी साहेब पंतप्रधान व्हावेत, ते कसे होईल, अशी चर्चा सुरू होती, त्यात मी माझे वैयक्तिक मत व्यक्त केले. आणि त्यात मी काहीही चुकीचे बोललो नाही.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App