हवामान खात्याने व्यक्त केला सुखावह अंदाज, यावर्षी 106% पाऊस, ला-निनामुळे ऑगस्टमध्ये दमदार बरसणार

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : भारतीय हवामान खात्याने (आयएमडी) यंदा सरासरी ते त्याहून अधिक म्हणजे 106% पावसाचा अंदाज सोमवारी व्यक्त केला आहे. देशात जून ते सप्टेंबरदम्यानच्या हंगामात सरासरी 87 सेंटिमीटर पाऊस होणे अपेक्षित असते. यंदा तो 91.5 सेंमी होण्याचा अंदाज आहे.Meteorological department has expressed favorable forecast, 106% rainfall this year, strong rains in August due to La Nina

‘ला- निना’ची परिस्थिती जुलैअखेर निर्माण होईल. त्यामुळे ऑगस्ट व सप्टेंबरमध्येच दमदार पाऊस होऊ शकतो. फक्त जम्मू-कश्मीर, लडाख, हिमाचल, उत्तराखंड, आसाम, अरुणाचल, मेघालय, त्रिपुरा, मणिपूर, मिझोराम, ओडिशा, छत्तीसगड, बंगाल व झारखंड या राज्यांत सरासरीपेक्षा कमी पावसाचे संकट उद‌्भवू शकते.‘स्कायमेट’ या खासगी संस्थेनेही १०२% पावसाचा अंदाज वर्तवला होता.



शेवटच्या 2 महिन्यांत चांगला पाऊस पडेल, असे सांगितले होते. गेल्या वर्षी एल-निनो’ची परिस्थिती असल्याने सरासरीपेक्षा कमी म्हणजे ९४.४ % पाऊस झाला.मागील ३६ वर्षात म्हणजे १९८८ ते २०२३ दरम्यान हवामान खात्याने वर्तवलेला अंदाज १८ वेळा अचूक तर १८ वेळा चूकीचा ठरला. मात्र गेल्या दशकापासून त्यात सुधारणा होत आहे. मागील ३ वर्षांत २०२१, २०२२ व २०२३ मधील हवामान खात्याचे अंदाज मात्र अचूक ठरले.

परिस्थिती अनुकूल म्हणून दमदार पाऊस पडण्याची शक्यता

अनेक फॅक्टरचा मान्सूनवर परिणाम होत असतो. मात्र सरासरीहून अधिक पावसाची तीन कारणे दिसत आहेत.एक : मान्सूनच्या आगमनावेळी ‘एल-निनो’चा प्रभाव संपतोय. त्यामुळे १ महिन्यात ला-निना येईल. केरळमध्ये मान्सूनचे आगमन १५ मेपर्यंत होऊ शकते, असा हवामान खात्याचा अंदाज आहे.

देशाच्या जीडीपीत कृषी क्षेत्राचे योगदान १४% आहे. या क्षेत्राचे योगदान वाढू शकेल. चांगल्या पावसामुळे महागाई ०.५% घटेल. म्हणजे आरबीआयच्या अंदाजानुसार ती ५.३% हून कमी ४.८ टक्क्यांपर्यंत येऊ शकते. महागाई नियंत्रित राहिली तर आरबीआय व्याजदर कमी करू शकेल. गृहकर्ज, वाहन कर्जाचे दर कमी होऊ शकतील.

Meteorological department has expressed favorable forecast, 106% rainfall this year, strong rains in August due to La Nina

महत्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात
    Icon News Hub