विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : पंजाब नॅशनल बँक गैरव्यवहार प्रकरणातील फरार आरोपी मेहुल चोक्सी याला डॉमिनिकामध्ये पोलिस कोठडीतून सरकारी कारागृहात पाठविण्यात आले. ही घडामोड त्याच्यासाठी अनुकूल मानली जात आहे.Mehul Choksi will admitted in hospital
चोक्सी याचा जामिनाचा अर्ज फेटाळण्यात आला आहे. त्याच्या प्रत्यार्पणासाठी भारताने डॉमिनिका उच्च न्यायालयाशी संपर्क साधला आहे. त्यासाठी दोन प्रतिज्ञापत्रे सादर करण्यात आली आहेत. चोक्सीला अँटिग्वामध्ये परत पाठविण्यात यावे अशी भारताची मागणी आहे.
तो अजूनही भारताचाच नागरिक असल्याचाही युक्तिवाद आहे. केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) बुधवारी पुरवणी आरोपपत्र दाखल केले. त्यात सक्तवसुली संचालनालयाच्या कारवाईबाबत आधीच माहिती मिळाल्यामुळे त्याने पलायन करण्याचा व पुरावे दडविण्याचा कट केला असा आरोप ठेवण्यात आला.
चोक्सी यांची प्रकृती खालावली असल्याने त्यांच्या जीवीताला धोका असल्याचे त्यांच्या वकीलांनी सांगितल्याने अखेर त्यांना रुग्णालयात हलवण्याची परवानगी देण्यात आली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App