हिंदुत्वाच्या मुद्द्यावर मेहबूबा मुफ्ती यांचे राहुल गांधी, सलमान खुर्शीद यांच्या सुरात सूर!!


वृत्तसंस्था

श्रीनगर : हिंदुत्व आणि हिंदू धर्म वेगवेगळे आहेत. हिंदुत्व म्हणजे मुसलमान आणि शिखांना मारणे होय, अशा शब्दांत काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी हिंदुत्वावर टीकेची झोड उठवली होती. त्याचीच री आज जम्मू काश्मीर मधील पीडीपीच्या नेत्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी ओढली आहे. Mehbooba Mufti’s Rahul Gandhi, Salman Khurshid’s tune on the issue of Hindutva !!

हिंदुत्व आणि हिंदू धर्म या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. परंतु राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजप यांनी दोन्ही गोष्टींवर कब्जा केला आहे. त्या संघटनांना हिंदू – मुसलमानांमध्ये फूट पाडून राज्य करायचे आहे, असा आरोप मेहबूबा मुफ्ती यांनी केला आहे.

काँग्रेसचे वरिष्ठ नेते सलमान खुर्शीद यांनी अयोध्येविषयी लिहिलेल्या पुस्तकात हिंदुत्वाची तुलना आयएसआयएस आणि बोको हराम या कट्टरतावादी हिंसक इस्लामी दहशतवादी संघटनांची केली होती. त्यानंतर राहुल गांधी यांनी हिंदुत्व म्हणजे मुसलमानांना आणि शिखांना मारणे होय, अशी “नवी व्याख्या” केली होती.याच मुद्द्यावर मेहबूबा मुक्ती यांनी आपले मत व्यक्त केले आहे. त्या म्हणाल्या, की हिंदुत्व आणि हिंदू धर्म या दोन्ही गोष्टींवर संघ आणि भाजपने कब्जा केला आहे. त्यांना हिंदु-मुसलमानांमध्ये फूट पाडून राज्य करायचे आहे. देशात हिंसाचार घडवून आणायच आहे. त्या संघटनांची तुलना आयएसआयएस यांच्यासारख्या दहशतवादी संघटनांशी करण्यात काहीच गैर नाही. कारण त्या संघटना तशाच आहेत. त्या संघटना धर्माच्या आधारावरच लोकांच्या हत्या करतात, अशा शब्दात मेहबूबा मुफ्ती यांनी टीकास्त्र सोडले आहे. राहुल गांधी आणि सलमान खुर्शीद या दोन्ही नेत्यांच्या वक्तव्याशी एक प्रकारे त्यांनी सहमती दर्शवून त्या दोन्ही नेत्यांच्या वक्तव्यांचीच री ओढली आहे.

Mehbooba Mufti’s Rahul Gandhi, Salman Khurshid’s tune on the issue of Hindutva !!

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*