जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांना इस्त्राएलमध्ये दहशतवादी कारवाया करणाऱ्या हमासच्या दहशतवाद्यांचा पुळका आला आहे. इस्त्राएलविरुध्द निदर्शने करणाऱ्यांना कोरोना नियमावलीचा भंग केल्याप्रकरणी अटक केल्यावर काश्मीर हा खुला तुरुंग झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे.Mehbooba Mufti questions arrest of protesters accusing Hamas militants of being Kashmir’s open prison
विशेष प्रतिनिधी
श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांना इस्त्राएलमध्ये दहशतवादी कारवाया करणाऱ्या हमासच्या दहशतवाद्यांचा पुळका आला आहे.
इस्त्राएलविरुध्द निदर्शने करणाऱ्यांना कोरोना नियमावलीचा भंग केल्याप्रकरणी अटक केल्यावर काश्मीर हा खुला तुरुंग झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
मेहबूबा मुफ्ती म्हणाल्या, संपूर्ण जगात इस्त्राएल पॅलेस्टिीनींवर करत असलेल्या अत्याचारांचा निषेध केला जात आहे. निदर्शने होत आहे. मात्र, काश्मीरमध्ये यासाठी शिक्षा केली जात आहे.
काश्मीरमध्ये एका कलावंताने पॅलेस्टिनींविषयी सहानुभूती दाखविल्यावर त्यला अटक करण्यात आली. श्रीनगर आणि शोपियान जिल्ह्यात इस्त्राएलविरुध्द निदर्शने करणाऱ्या २१ कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली.
त्यासाठी कोरोना नियमावलीचे कारण देण्यात आले. दक्षिण काश्मीरमधील मौलाना सरजन बरकाती यांनी पॅलेस्टिीनींना पाठिंबा दिल्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.
यावर मेहबूबा मुफ्ती म्हणाल्या, काश्मीर हा खुला तुरंग झाला आहे. लोकांना अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य राहिले नाही. आपले मत व्यक्त करण्यापासून रोखले जात आहे.
मोह्ममद अर्शफ शहराई या विघटनवादी नेत्याच्या दोन मुलांना पब्लीक सेफ्टी अॅक्टखाली सरकारने अटक केली आहे. त्यावर मेहबूबा मुफ्ती म्हणाल्या, हा कायदा लावून धरपकड करणे हा काश्मीरच्या प्रत्येक प्रश्नावर केंद्र सरकारचा उपाय आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App