विशेष प्रतिनिधी
जयपूर – कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मागण्या केंद्र सरकारने पूर्ण केल्या नाहीत तर हे सरकार पुन्हा सत्तेवर येऊ शकणार नाही, असा इशारा मेघालयचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी दिला आहे.Meghayala governor backs farmers agitation
शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या मुद्यावर मी अनेकांशी भांडलो आहे. त्यांच्यासाठी मी पंतप्रधान, गृह मंत्र्यांपासून सर्वांशी मी भांडलो आहे. तुम्ही चुकीचे करीत आहात, असे करू नका, असेही मी प्रत्येकाला सांगितले आहे, असेही उत्तर प्रदेशमधील जाट नेते असलेले मलिक म्हणाले.
पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले,‘‘ जर मोदी सरकारने किमान आधारभूत किमतीच्या (एमएसपी) हमीवर कायदा करायला हवा. ‘एमएसपी’वर कायदा झाल्यावर शेतकऱ्यांचे आंदोलन थांबेल आणि या प्रकरणात निश्चिकतपणे मार्ग काढता येईल. उत्तर प्रदेशात आगामी निवडणुकीच्या पार्श्विभूमीवर अनेक गावात भाजप नेते प्रवेश करू शकत नाहीत. मी मूळचा मेरठचा आहे. माझ्या भागात भाजपचा एकही नेता गावात फिरकू शकत नाही. मुझफ्फरनगर, बागपतमध्येही हीच स्थिती आहे.’’
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App