प्रसिध्द अभिनेता आमिर खान याने आपल्या सत्यमेव जयते या कार्यक्रमात वैद्यकीय क्षेत्रातील औषधांच्या किंमतीवर प्रश्नचिन्ह निर्माण केले होते. वास्तविक किंमतींच्या 50 पट अधिक दराने ही औषधे विकली जात असल्याचा आरोप केला होता. हिंमत असेल तर या मेडीकल माफियांनी आमिर खानविरुध्द गुन्हा दाखल करावा, मोर्चे काढावेत असे आव्हान योगगुरू बाबा रामदेव यांनी इंडियन मेडीकल असोसिएशनला दिले आहे.Medical mafia should file case against Aamir Khan if he has the guts, yoga guru Baba Ramdev challenges IMA
विशेष प्रतिनिधी
मुंबई : प्रसिध्द अभिनेता आमिर खान याने आपल्या सत्यमेव जयते या कार्यक्रमात वैद्यकीय क्षेत्रातील औषधांच्या किंमतीवर प्रश्नचिन्ह निर्माण केले होते. वास्तविक किंमतींच्या 50 पट अधिक दराने ही औषधे विकली जात असल्याचा आरोप केला होता.
हिंमत असेल तर या मेडीकल माफियांनी आमिर खानविरुध्द गुन्हा दाखल करावा, मोर्चे काढावेत असे आव्हान योगगुरू बाबा रामदेव यांनी इंडियन मेडीकल असोसिएशनला दिले आहे.
योगगुरू रामदेव बाबा यांनी अॅलोपॅथी उपचारपद्धतीवर टीका केल्यानंतर आयएमएने त्यांच्यावर टीका केली होती. न्यायालयातही याचिका दाखल केली आहे. या पार्श्वभूमीवर बाबा रामदेव यांनी शनिवारी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन आमीर खानचा एक व्हिडिओ शेअर केला आहे.
इन मेडिकल माफियाओं में हिम्म्त है तो आमिर खान के खिलाफ मोर्चा खोलें- वीडियो साभार-स्टार प्लस pic.twitter.com/ZpNT8CSohD — स्वामी रामदेव (@yogrishiramdev) May 29, 2021
इन मेडिकल माफियाओं में हिम्म्त है तो आमिर खान के खिलाफ मोर्चा खोलें-
वीडियो साभार-स्टार प्लस pic.twitter.com/ZpNT8CSohD
— स्वामी रामदेव (@yogrishiramdev) May 29, 2021
मेडिकल माफियांमध्ये हिंमत असेल, तर आमीर खानविरुद्ध मोर्चा काढा, असे आव्हानच रामदेव यांनी दिले आहे. या व्हिडिओमध्ये आमीरने देशातील वैद्यकीय क्षेत्रात काम करणाºया तज्ज्ञांसोबत चर्चा केली आहे.
त्यामध्ये, वैद्यकीय क्षेत्रातील औषधांच्या किंमतीवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आले आहे. वास्तविक किंमतींच्या 50 पट अधिक दराने ही औषधे विकली जात असल्याचा आरोप केला होता.
देशातील बड्या औषध कंपन्या आणि मेडिकल माफिया एलोपॅथी औषधांच्या माध्यमातून 2 लाख कोटी रुपयांची उलाढाल करुन मोठा नफा कमावतात. या क्षेत्राशी निगडीत लोक स्वाथार्पोटी मोठा नफा कमावून औषधांची चढ्या दराने विक्री करतात,
असा आरोप बाबा रामदेव यांनी केला आहे. देशातील नागरिकांना आयुवेर्दांच्या माध्यमातून स्वस्त आणि सुलभ उपचार देऊ इच्छित असल्याचही रामदेव यांनी म्हटलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App