हिंदूंना बदनाम करू नका, हे तर पाप, देश तुम्हाला कधीही माफ करणार नाही, बाबा रामदेव यांचा कॉँग्रेसवर हल्लाबोल


देशातील १०० कोटींपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या हिंदूंना बदनाम करू नका. टूल किटच्या माध्यमातून कुंभ मेळा, सनातन हिंदू धर्माला बदनाम करणे, सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय कट हे पाप आणि गुन्हा आहे. तुम्ही अतिशय वाईट काम करत आहात. देश तुम्हाला कधीही माफ करणार नाही. देशातील लोकांनी अशा सनातनी आणि भारतविरोधी शक्तींचा एकत्र येऊन बहिष्कार करायला हवा, अशा शब्दांत योगगुरू बाबा रामदेव यांनी कॉँग्रेसवर निशााणा साधला आहे. Don’t defame Hindus, this is a sin, the country will never forgive you, Baba Ramdev attacks Congress


प्रतिनिधी

नवी दिल्ली: देशातील १०० कोटींपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या हिंदूंना बदनाम करू नका. टूल किटच्या माध्यमातून कुंभ मेळा, सनातन हिंदू धर्माला बदनाम करणे, सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय कट हे पाप आणि गुन्हा आहे. तुम्ही अतिशय वाईट काम करत आहात. देश तुम्हाला कधीही माफ करणार नाही. देशातील लोकांनी अशा सनातनी आणि भारतविरोधी शक्तींचा एकत्र येऊन बहिष्कार करायला हवा, अशा शब्दांत योगगुरू बाबा रामदेव यांनी कॉँग्रेसवर निशााणा साधला आहे.

कोरोना विषाणूला भारतीय स्ट्रेन किंवा मोदी स्ट्रेन असे संबोधण्याचे टूल किट जारी करून काँग्रेस जगभरात देशाची आणि विशेषत: पंतप्रधान मोदी यांची प्रतिमा मलिन करत आहे असा आरोप भारतीय जनता पाटीर्ने मंगळवारी केला. यावरून आता बाबा रामदेव यांनीही कॉँग्रेसवर निशाणा साधला आहे. बाबा रामदेव यांनी म्हटले आहे की, जे लोक असं करत आहेत, त्यांना माझी हात जोडून विनंती आहे. तुम्ही राजकारण करा, पण 100 कोटींपेक्षा जास्त असलेल्या हिंदू्ंचा अपमान करू नका.



भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते संबित पात्रा यांनीही ट्विट करून म्हटले आहे की, कोरोनाच्या संकटात राहूल गांधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिमा मलिन करण्याची संधी शोधत आहेत, ही अतिशय शरमेची बाब आहे. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना देशातील कोरोना विषाणूला मोदी स्ट्रेन म्हणा, असे सांगितले जात आहे. काही परदेशी पत्रकारांच्या मदतीने काँग्रेस भारताची प्रतिमा मलिन करू पहात आहे.

Don’t defame Hindus, this is a sin, the country will never forgive you, Baba Ramdev attacks Congress

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात