विशेष प्रतिनिधी
मुंबई : सध्या कुत्र्यांची वेळ आहे. करबल्याचे आखरी मैदान बाकी आहे. आपलीही वेळ येईलच. तेव्हा त्यांच्याकडे पाहून घेऊ, अशी हिंदूद्वेष्टी दर्पोक्ती करणाऱ्या मौलाना मुफ्ती सलमान अझहरीला गुजरात एटीएसने घाटकोपर मध्ये येऊन अटक केल्यानंतर त्याच्या समर्थकांनी घाटकोपरमध्ये मोठा दंगा केला, पण मुंबई पोलिसांनी लाठीमार करून दंगेखोरांना धडा शिकवला. Maulana Mufti Salman Azhari arrested
मौलाना मुफ्ती सलमान अझहरीने गुजरात मधल्या जुनागडमध्ये प्रक्षोभक भाषण केले होते. त्यात त्याने सध्या कुत्र्यांची वेळ आहे. पण करबलाचे आखरी मैदान बाकी आहे. आपली वेळ येईलच. त्यावेळी त्यांना धडा शिकवू, अशी चिथावणीखोर भाषा वापरली होती. त्या भाषणामुळेच मौलाना मुफ्ती सलमान अझहरी आणि त्याच्या साथीदारांवर गुजरात पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.
त्या मौलाना मुफ्ती सलमान अझहरीला गुजरात एटीएसने काल सायंकाळी घाटकोपर मध्ये येऊन अटक केली. हेट स्पीच प्रकरणी मुफ्ती सलमान अझहरीवर कलम 153 ए, 505, 188, 114 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच या प्रकरणी जुनागड पोलिसांनी आणखी दोघांना अटक केली आहे.
मुफ्ती सलमान अजहरीने 31 जानेवारीच्या रात्री जुनागड येथील मोकळ्या मैदानात आयोजित एका कार्यक्रमाला भाषण केले होते. या कार्यक्रमात मुफ्तीने हिंदूद्वेष्टी आक्षेपार्ह वक्तव्य केली होती. मुफ्तीचे ते भाषण व्हायरल झाले. यानंतर पोलिसांनी या प्रकरणी एफआयआर दाखल केला होता. मौलाना मुफ्ती आणि कार्यक्रमाचे आयोजक मोहम्मद युसूफ मलिक आणि अझीम हबीब ओडेदरा यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. तेव्हापासून त्यांचा शोध सुरू होता.
या प्रकरणी मलिक आणि हबीब यांना यापूर्वीच अटक करण्यात आली आहे. या लोकांनी कार्यक्रमासाठी पोलिसांकडून परवानगी घेतली होती. अजहरी धर्माविषयी बोलणार नसून व्यसनमुक्तीबाबत जनजागृती करतील, असे सांगून त्यांनी कार्यक्रमासाठी पोलिसांची परवानगी घेतली होती. मात्र, त्याऐवजी त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्याचे पोलिसांनी सांगितले. मौलाना मुफ्ती सलमान अजहरी यांना गुजरात एटीएसने घाटकोपर मधून अटक केली.
यावेळी अजहरी समर्थकांनी घाटकोपरमध्ये मोठा दंगा केला. रस्ते अडवून ठेवले. त्यामुळे पोलिसांनी कठोर कारवाई करत दंगेखोरांवर लाठीमार केला आणि सगळे रस्ते मोकळे केले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App