वृत्तसंस्था
इंफाळ : मणिपूरमधील 2 विद्यार्थ्यांच्या हत्येप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) पाचव्या आरोपीला अटक केली आहे. सीबीआयने 22 वर्षीय पौलुनमंग या तरुणाला पुण्यातून अटक केली आहे. दोन विद्यार्थ्यांच्या हत्येमागे सीबीआय पॉलुनमंगला मुख्य सूत्रधार मानत आहे.Mastermind who killed students in Manipur nabbed; Fifth arrest in double murder
मीडिया रिपोर्ट्सनुसार, पॉलुनमंगला 11 ऑक्टोबर रोजी अटक करण्यात आली होती, ज्याची बातमी आता समोर आली आहे. अटकेनंतर आरोपीला गुवाहाटी येथील विशेष न्यायालयात हजर करण्यात आले. तेथून त्याला 16 ऑक्टोबरपर्यंत सीबीआय कोठडी सुनावण्यात आली आहे.
याप्रकरणी सीबीआयने 1 ऑक्टोबर रोजी चार आरोपींना अटक केली होती. यापैकी दोन पुरुष – पाओमिनलून हाओकिप, एस. मालास्वान हाओकिप आणि दोन महिला – लिंगनीचॉन बायटेकुकी आणि टिनेलिंग हेन्थांग.
23 सप्टेंबर रोजी विद्यार्थ्यांचे फोटो व्हायरल
23 सप्टेंबर रोजी मोबाईल इंटरनेटवरील बंदी उठल्यानंतर दोन विद्यार्थ्यांच्या मृतदेहाची छायाचित्रे समोर आली होती. हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. फोटोमध्ये दोघांचेही मृतदेह जमिनीवर पडलेले दिसत आहेत. तसेच मुलाचे डोके कापण्यात आले आहे. मात्र, दोन्ही विद्यार्थ्यांचे मृतदेह अद्याप सापडलेले नाहीत. जुलै महिन्यात एका दुकानात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात हे दोन्ही विद्यार्थी अखेरचे दिसले होते.
दोन्ही विद्यार्थ्यांच्या हत्येनंतर मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार उसळला. 28 सप्टेंबर रोजी, इंफाळ पश्चिम जिल्ह्यातील टेरा येथे हजारो लोक पीडितेच्या घराजवळ जमले. जुलै महिन्यापासून बेपत्ता झालेल्या विद्यार्थ्यांचा शोध घेऊन आरोपींना अटक करण्याची त्यांची मागणी होती.
त्याच वेळी, मृत मुलाच्या नातेवाइकांनी म्हटले होते की, त्यांना फक्त मुलांचे मृतदेह हवे आहेत जेणेकरून ते त्यांच्यावर अंत्यसंस्कार करू शकतील. आम्ही कोणत्याही बाबतीत तडजोड करणार नाही, आर्थिक नुकसानभरपाईही स्वीकारणार नाही, जोपर्यंत मृतदेह त्यांना परत मिळत नाही, असे त्यांनी सांगितले होते.
आतापर्यंत 180 हून अधिक मृत्यू, 1100 जण जखमी
मणिपूरमध्ये 3 मे रोजी जातीय हिंसाचार सुरू होऊन 5 महिने लोटले आहेत. राज्यात आतापर्यंत 180 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 1100 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. एवढेच नव्हे तर जाळपोळीचे 5172 गुन्हे नोंदवण्यात आले असून त्यात 4786 घरे आणि 386 धार्मिक स्थळांची जाळपोळ आणि तोडफोड करण्यात आली आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App