पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांसाठी भाजपा आणि काँग्रेससह सर्व पक्षांनी तयारी केली आहे
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांसाठी भाजपा आणि काँग्रेससह सर्व पक्षांनी तयारी केली आहे. निवडणुकीच्या तारखा जाहीर होताच पक्ष उमेदवारांची घोषणा करत आहेत आणि महत्त्वाच्या जबाबदाऱ्यांसाठी नेत्यांची नियुक्ती करत आहेत. आता याच पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने मिझोराम विधानसभा निवडणुकीसाठी काही महत्त्वपूर्ण नियुक्त्या केल्या आहेत. BJP has given huge responsibility to Kiren Rijiju and Anil Antony for Mizoram Assembly elections
पुढील महिन्यात होणाऱ्या मिझोरम विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांची निवडणूक प्रभारी म्हणून नियुक्ती केली आहे. पक्षाने नागालँडचे उपमुख्यमंत्री यंथुंगो पॅटन आणि पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस अनिल अँटोनी यांची मिझोराम निवडणुकीसाठी सह-प्रभारी म्हणून नियुक्ती केली आहे. तसेच पक्षाने जतिंदर पाल मल्होत्रा यांची चंदीगड भाजपच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मिझोरम विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या प्रचारासाठी काँग्रेस नेते राहुल गांधी 16 ऑक्टोबरपासून तीन दिवस राज्याचा दौरा करू शकतात. मिळालेल्या माहितीनुसार, राहुल यांच्या मिझोराम दौऱ्यात काँग्रेसही आपल्या उमेदवारांची घोषणा करणार आहे. येथे राहुल गांधी ऐजॉल शहरात मोर्चात सहभागी होऊन लोकांशी संवाद साधतील.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App