विशेष प्रतिनिधी
भुवनेश्वर – ओडिशात मुसळधार पावसामुळे हिराकूड धरणाचे २८ दरवाजे उघडले असून महानदीची पातळी वेगाने वाढत चालली आहे. चोवीस जिल्ह्यात पूरस्थिती असून आतापर्यंत साडेसात हजाराहून अधिक घरांची पडझड झाली आहे. गेल्या चोवीस तासात सहा जणांचा मृत्यू झाला आहे. Massive flood in Odisha
काल सायंकाळी सहापर्यंत आखुआपदा येथे वैतरणी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. तर मथनी येथे जलका नदीची पातळी देखील वाढली आहे. तसेच वरच्या भागात मुसळधार पावसामुळे हिराकूड धरणाचे २८ दरवाजे उघडले आहेत. सलग पावसामुळे २४ जिल्ह्यांना फटका बसला असून ७ हजार ५४० घरांची पडझड झाली आहे.
बंगालच्या उपसागरात कमी दाबामुळे निर्माण झालेला प्रभाव कमी झाला असला तरी सलग तीन दिवसांपासून पडणाऱ्या पावसामुळे सखल भागात पाणी साचले आहे. काल राज्यातील १२ जिल्ह्यात २३ ब्लॉकमध्ये ५० मिलिमीटर पाऊस झाला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App