Maharashtra Flood: मुख्यमंत्र्यांचा दौरा रद्द ; तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रविण दरेकर सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर


विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि प्रविण दरेकर हे सातारा जिल्ह्याच्या दौर्यावर आहेत. Maharashtra Flood: CM’s visit canceled; Opposition leaders Devendra Fadnavis and Pravin Darekar on a tour of Satara district


विशेष प्रतिनिधी

सातारा : राज्यात पावसाने धुमाकूळ घातला आहे. यामुळे सातारा जिल्ह्यात अनेक भागात दरड कोसळण्याच्या घटना घडल्या आहे. सातारा जिल्ह्यातील मोरगिरी, आंबेघर, हुंबरळी तालुक्यात महापूर आला असून जनजीवन विस्कळीत झालं आहे.

पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर आज सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत.

सातारा जिल्ह्यात महापुराचा वेढा पडला असून बाजारपेठ, एसटी स्टँडसह शेकडो घरांमध्ये पाणी शिरलं असुन मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. संध्या पुराचे पाणी ओसरले असून आता सर्वत्र चिखल झाला आहे. अनेक भागात दरड कोसळली असुन अनेक जण दगावले आहे.विरोधी पक्षनेते पुरग्रस्त नुकसानीचा व तेथील परिस्थीतीचा आढावा घेण्याकरीता सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. दौऱ्याची सुरूवात मोरगिरी, आंबेघर तालुक्यातील पाटण गावापासुन होणार आहे. पाटण गावातील पूरग्रस्त भागाची पाहणी दुपारी 2.45 वाजता करणार आहेत.

मोरगिरी, आंबेघर तालुक्यातुन कोयनानगर येथील प्रथमिक केंद्र शाळा येथे स्थलांतरीत करण्यात आलेल्या नागरिकांची संध्याकाळी 4.30 वाजता भेट घेणार आहेत. त्याचबरोबर हुंबरळी तालुक्यातील पाटण गावामधील अतिवृष्टीग्रस्त भागाची संध्याकाळी 5.15 वाजता पाहणी करणार असल्याचे दरेकर यांनी सांगितले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे 26 जुलै रोजी सातारा येथे जाऊन तेथील पूरस्थितीची पाहणी करणार होते. मात्र खराब हवामानामुळे त्यांचं हेलिकॉप्टर पुन्हा पुण्यात परतलं होतं. सातारा दौऱ्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हेलिकॉप्टरने पुण्याहून उड्डाण केलं होतं. मात्र अत्यंत खराब वातावरण असल्याने एअरफोर्सचं हेलिकॉप्टर पुन्हा पुणे विमानतळावर आणण्यात आलं होतं.

Maharashtra Flood : CM’s visit canceled; Opposition leaders Devendra Fadnavis and Pravin Darekar on a tour of Satara district

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण