वृत्तसंस्था
चंदीगड : हरियाणातील ४ जिल्ह्यांमध्ये सार्वजनिक ठिकाणी मास्क अनिवार्य केला आहे. कोरोना संक्रमण वाढल्याने हा निर्णय सरकारने घेतला. Masks mandatory in public places in 4 districts of Haryana; Decision due to increased corona infection
हरियाणाचे आरोग्य मंत्री अनिल विज यांनी सांगितले की, कोविड-१९ ची वाढती प्रकरणे पाहता, राज्यातील ४ जिल्ह्यांमध्ये मास्क अनिवार्य केला आहे. गुरुग्राम, फरिदाबाद, झज्जर आणि सोनीपत हे चार जिल्हे आहेत.
या जिल्ह्यात सार्वजनिक ठिकाणी मास्क घालणे अनिवार्य करण्यात आले आहे. मास्क न लावल्यास दंड आकारण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. विशेष म्हणजे सोमवारी गुरुग्राममध्ये कोरोनाचे १९८ रुग्ण आढळले. त्यामुळे खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App