मार्क झुकरबर्गचे कोट्यवधींचे नुकसान; सर्व्हर डाऊनमुळे फेसबुकला ५९६ कोटींचा फटका


वृत्तसंस्था

न्यूयॉर्क : फेसबुक काही तासांसाठी गंडल्याने कोट्यवधींची उलाढाल ठप्प झाली. त्याचा आर्थिक फटका कंपनीला बसला आहे. सहा तासांत सर्व्हर डाऊनमुळे कंपनीला ५९६ कोटींचा फटका बसला आहे. तर मार्क झुकरबर्गचे ५२ हजार कोटींचे नुकसान झाल्याचे वृत्त आहे. Mark Zuckerberg’s loss of Crores; 596 crore hit to Facebook due to server down

व्हॉट्सऍप, इन्स्टाग्राम, फेसबुक आणि मेसेंजर पुन्हा सुरू झालं आहे. सोमवारी रात्री १० च्या सुमारास सोशल मीडियातील सेवा ६ तास बंद होत्या.
फेसबुक काही तासांसाठी गंडल्याने कोट्यवधींची उलाढाल ठप्प झाली होती. त्यामुळे, आर्थिक गणित पाहिल्यास मोठा फटका कंपनीला बसला. फेसबुकने एक पत्र जारी करुन सर्व्हर डाऊनचा कंपनीला किती फटका बसला हे सांगितलं.फेसबुकला व्यत्ययामुळे कंपनीचे संस्थापक मार्क झुकरबर्गची संपत्ती एका दिवसात ७ बिलियन्स डॉलर म्हणजेच ५२,१९० कोटी रुपयांनी घटली आहे. तर, फेसबुकला आलेल्या या डाऊन क्रॅशमुळे कंपनीच्या रेव्यन्यूमध्ये ८० मिलियन्स डॉलर म्हणजेच जवळपास ५८६ कोटी रुपयांपेक्षा अधिक नुकसान झाले आहे. फेसबुक, इन्स्ट्राग्राम आणि व्हॉट्सअप बंद पडल्याने इंटरनेट ग्लोबल ऑब्जर्वेटरीच्या अंदाजानुसार जगभरातील अर्थव्यवस्थेला प्रति तासाला १६० मिलियन्स डॉलर म्हणजेच ११९२.९ कोटी रुपयांपेक्षा अधिक नुकसान झाले आहे.

मार्क झुकरबर्गने मागितली माफी

तुमची काळजी करणाऱ्या तुमच्या लोकांसोबत तुम्ही या प्लॅटफॉर्मद्वारे किती जोडले आहात, हे मला माहिती आहे. या सेवांमुळे ती बांधिलकी जपली आहे. त्यामुळेच, आमच्याकडून झालेल्या व्यत्ययाबद्दल मी आपणा सर्वाची माफी मागतो, अशी फेसबुक पोस्ट फेसबुकचा संस्थापक मार्क झुकरबर्गने केली.

Mark Zuckerberg’s loss of Crores; 596 crore hit to Facebook due to server down

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*