शुक्रवारी रात्री सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुक, व्हॉट्सअॅप आणि इन्स्टाग्रामने अचानक काम करणे बंद केले. सेवा अचानक विस्कळीत झाल्याने भारतासह जगभरातील अनेक देशांमधील युजर्स कमालीचे अस्वस्थ झाले. हे सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स जवळपास अर्धा तास बंद राहिले. हे पाहिल्यावर लोकांनी त्याबद्दल तक्रारी करण्यास सुरुवात केली. ट्विटरवर नेटकऱ्यांनी याबद्दल अनेक प्रतिक्रिया दिल्या. शुक्रवाराचा दिवस सोशल मीडियासाठी ‘ब्लॅक फ्रायडे’च ठरला. तथापि, अर्ध्या तासानंतर व्हॉट्सअॅप आणि इन्स्टाग्राम पूर्ववत झाल्यावर लोकांनी नि:श्वास घेतला. Social Media Down : WhatsApp, facebook and Instagram servers down for half an hour worlwide
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : शुक्रवारी रात्री सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुक, व्हॉट्सअॅप आणि इन्स्टाग्रामने अचानक काम करणे बंद केले. सेवा अचानक विस्कळीत झाल्याने भारतासह जगभरातील अनेक देशांमधील युजर्स कमालीचे अस्वस्थ झाले. हे सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स जवळपास अर्धा तास बंद राहिले. हे पाहिल्यावर लोकांनी त्याबद्दल तक्रारी करण्यास सुरुवात केली. ट्विटरवर नेटकऱ्यांनी याबद्दल अनेक प्रतिक्रिया दिल्या. शुक्रवाराचा दिवस सोशल मीडियासाठी ‘ब्लॅक फ्रायडे’च ठरला. तथापि, अर्ध्या तासानंतर व्हॉट्सअॅप आणि इन्स्टाग्राम पूर्ववत झाल्यावर लोकांनी नि:श्वास घेतला.
सर्व्हर डाऊन असताना लोक फेसबुक मेसेंजरवरही संदेश पाठवू शकले नाहीत. व्हॉट्सअॅप-इन्स्टाग्रामवरही मेसेजेस जात नव्हते. हे सर्व अॅप्स सुरू होत असले तरी फेसबुक आणि इन्स्टाग्रामच्या न्यूज फीड रिफ्रेश होत नव्हत्या.
असे म्हटले जातेय की फेसबुकच्या मालकीच्या या सर्व अॅप्समधील समस्या भारतीय वेळेनुसार रात्री 11.05 मिनिटांपासून सुरू झाल्या. अद्याप कंपनीकडून कोणतेही स्पष्टीकरण आलेले नाही. यापूर्वीही अनेकदा फेसबुक डाऊन झाले आहे. व्हॉट्सअॅप आणि इन्स्टादेखील डाऊन राहिलेले आहेत. अशा घटनांनंतर सहसा कंपनी एखादे निवेदन जारी करते, परंतु नेमकी समस्या काय आहे, याबद्दल कोणतीही माहिती देत नाही.
व्हॉट्सअॅप आणि अशा तऱ्हेच्या सेवा डाऊन झाल्याने सायबर क्राइमचा धोकाही वाढतो. एवढेच नव्हे, तर बर्याच वेळा सायबर हल्ल्यामुळेही या सेवाही डाऊन होतात. या कारणामागील कारण स्पष्ट झाले नाही.
सोशल मीडियावर ट्रेंड
रात्री 12 वाजेच्या सुमारास व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि इन्स्टाग्रामच्या सेवा पूर्ववत झाल्या. तिन्ही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुकचेच आहेत. मार्क झुकरबर्ग यांच्या मालकीचे ते आहे. तिन्ही एकत्रच डाऊन झाल्यानंतर मार्क झुकरबर्गने ट्विटरवर ट्रेंड होण्यास सुरुवात झाली. यापूर्वी फेसबुक डाऊन, व्हॉट्सअॅप डाऊन आणि इंस्टाग्राम डाऊनही असेही हॅशटॅग ट्विटरवर ट्रेंड झाले.
युजर्सनी दिल्या प्रतिक्रिया
हा मुद्दा ट्विटरवर बराच काळ ट्रेंड होत राहिला. बर्याच युजर्सनी मीम्सही शेअर केले. एका युजरने लिहिले की, व्हाट्सअप, फेसबुक आणि इंस्टाग्राम जवळपास एक तासासाठी डाउन होते. परंतु हा विषय 24 तास चर्चिला जाईल. यासाठी मार्क झुकरबर्ग आयुष्यभर ट्रोल होईल. तथापि, सेवा पूर्ववत झाल्यानंतर व्हॉट्सअॅपने ट्वीट करून माहिती दिली आहे की, आता सर्व काही ठीक आहे. परंतु समस्या काय होती याचा खुलासा मात्र त्यांनी केलाच नाही.