मणिपूर : राजीनाम्याच्या चर्चांच्या गोंधळात, मुख्यमंत्री बिरेन यांचे ट्वीट आले समोर, म्हणाले…

समर्थक महिलांनी सर्वांसमोर राजीनामा पत्र  फाडले

विशेष प्रतिनिधी

मणिपूर :  ईशान्येकडील मणिपूर राज्यात सुरू असलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एन बिरेन सिंह हे राजीनामा देणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला होता. मात्र खुद्द मुख्यमंत्री बिरेन यांनीच ट्वीट करत या सगळ्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. Manipur Chief Minister N Biren Singh will not resign

बिरेन यांनी ट्विट करून ”या महत्त्वपूर्ण प्रसंगी, मी स्पष्ट करू इच्छितो की मी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार नाही.” असे स्पष्ट केले आहे. तसेच, फाडलेले राजीनामा पत्रही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तत्पूर्वी बिरेन यांच्या अनेक महिला समर्थकांनी मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंह यांचे राजीनाम्याचे पत्र फाडले होते. मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांनी राज्यपाल अनुसुय्या उईके यांना भेटण्यासाठी इंफाळमधील राजभवनात जाण्याची योजना आखली होती. या भेटीत ते राज्यपालांना राजीनामा पत्र सुपूर्द करणार होते असं बोललं जात होतं.

शुक्रवारी सकाळी एन बिरेन सिंह गव्हर्नर हाऊसकडे रवाना झाले. दरम्यान, काही महिला समर्थकांनी राजभवनाबाहेर रास्ता रोको करत मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याला पुढे जाऊ दिले नाही. यानंतर काही महिला समर्थकांनी त्यांचा राजीनामा फाडून त्यांना राजीनामा न देण्याची विनंती केली.

मणिपूरमध्ये गुरुवारी पुन्हा हिंसाचार भडकला, त्यात तीन जण ठार आणि पाच जण जखमी झाले. त्यामुळे एन बिरेन सिंह यांच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्याची चर्चा जोर धरू लागली आहे. पीटीआयच्या म्हणण्यानुसार, महिला नेत्या क्षेत्रमयुम शांती म्हणाल्या, “या गंभीर वळणावर, बिरेन सिंह सरकारने खंबीरपणे उभे राहून बदमाशांवर कारवाई केली पाहिजे.”

Manipur  Chief Minister N Biren Singh will not resign

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात