विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : INDI आघाडीच्या चौथ्या बैठकीत ममता बॅनर्जी यांनी मल्लिकार्जुन खरगे यांना पंतप्रधान करण्याचा प्रस्ताव मांडून आघाडीतल्या बऱ्याच नेत्यांची दांडी उडवली. Mamata proposed mallikarjun kharge’s name for INDI alliance prime ministership, made dent in alliance
ममतांनी पंतप्रधान करण्याचा प्रस्ताव मांडला. ही दलित पंतप्रधान करण्याची उत्तम संधी आहे, असे सांगून अरविंद केजरीवालांनी ममतांच्या प्रस्तावाला पाठिंबा दिला, पण अखिलेश यादव गप्प बसले आणि सोनिया गांधी राहुल गांधी यांच्यासमोर स्वतः मल्लिकार्जुन खर्गे यांची गोची झाली.
राजधानी नवी दिल्लीतील अशोक हॉटेलमध्ये झालेल्या INDI आघाडीच्या आजच्या चौथ्या बैठकीची ही गोषवारा कहाणी आहे. 4 बैठका होऊनही केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधात एकजूट करून लढायचे, या एका ओळीच्या निर्धारा व्यतिरिक्त बाकी कुठलाही निर्णय INDI आघाडीत होऊ शकला नाही. आघाडीचा संयोजक, आघाडीचा लोगो आणि आघाडीचा एकच झेंडा याचा निर्णयही झाला नाही, पण त्याचवेळी ममता बॅनर्जी आघाडीच्या चौथ्या बैठकीत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचे नाव पंतप्रधान पदासाठी पुढे करून नितीश कुमार, अखिलेश यादव, अरविंद केजरीवाल आणि दस्तुर खुद्द स्वतः यांची राजकीय गोची केली, त्या पलीकडे जाऊन गांधी परिवाराची फार मोठी राजकीय गोची केली. कारण यापैकी प्रत्येक नेत्याच्या महत्त्वाकांक्षेला ममतांनी सुरुंग लावला.
पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारख्या ओबीसी नेत्या विरोधात एका दलित नेत्याला आपण पंतप्रधान पदाचा चेहरा केले, तर INDI आघाडीला फायदा होऊ शकतो, असे संगत ममतांनी मल्लिकार्जुन खर्गे यांचे नाव पुढे केले. त्यावेळी अरविंद केजरीवाल यांनी ताबडतोब ममता बॅनर्जी यांच्या प्रस्तावाला दलित पंतप्रधानाचा मुद्दा मान्य करून पाठिंबा दिला. पण अखिलेश यादव गप्प बसले. नितीश कुमार यांनी देखील तोंड उघडले नाही. या सगळ्या चर्चेत शरद पवारांना कोणी विचारले नाही आणि त्यांचे नावही कोणी घेतले नाही.
पण सोनिया गांधी आणि राहुल गांधी समोर ममतांनी आपल्या नावाचा प्रस्ताव पंतप्रधान पदासाठी मांडल्यामुळे स्वतः मल्लिकार्जुन खर्गे यांची गोची झाली. आपण आधी एकत्रित निवडणूक लढवू आणि मग पंतप्रधान पदाचा विचार करू, असे सांगून खर्गे यांनी आपली मान पंतप्रधान पदाच्या स्फोटक वादातून सोडवली. मोदी सरकार देशात लोकशाही संपुष्टात आणत आहे. खासदारांना अनेक प्रकारे त्रास देऊन निलंबित केले जात आहे मोदी सरकारला संसदेत विरोधकांचे अस्तित्वच नको आहे, असा आरोप खर्गे यांनी पत्रकार परिषदेत केला.
पण INDI आघाडीच्या चार बैठका होऊनही एक लोगो, एक संयोजक, एक झेंडा अथवा पंतप्रधान पदाचा एक उमेदवार का ठरू शकला नाही??, या सवालाचे उत्तर मात्र खर्गे यांनी दिले नाही
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App