विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : 2014 मध्ये केंद्रात मोदी सरकार आल्यानंतर पहिले वर्षभरातच काही घटनांचा निषेध करत पुरोगामी साहित्यिक कलावंतांनी पुरस्कार वापसीची चळवळ केली होती. त्या चळवळीला वेगवेगळ्या राज्यांमध्ये विरोधकांच्या सरकारांनी पाठिंबा दिला होता. तिचा सुरुवातीला मोदी सरकारला झटका बसला. परंतु त्यानंतर पुरस्कार वापसीचे नेटवर्क एक्स्पोज झाले. नंतर पुरस्कार वापसी तर थांबलीच. Mamata Banerjee
आता परत पुरस्कार वापसीच्या बातम्या समोर येऊ लागल्या आहेत. पश्चिम बंगालमध्ये कोलकत्यातील आर. जी. कार मेडिकल कॉलेजमध्ये डॉक्टर महिलेवर झालेल्या बलात्कार आणि हत्येचे प्रकरण पॉर्न नेटवर्क पर्यंत पोहोचले. त्याचे वेगवेगळे धागेदोरे उघडल्यानंतर त्या प्रकरणाचे सगळे गांभीर्य थेट कायदा सुव्यवस्थेपर्यंत पोहोचले. पश्चिम बंगाल मधले ममता बॅनर्जी सरकार पूर्णपणे अडचणीत आले. सरकारचे प्रशासन एक्स्पोज झाले. पश्चिम बंगाल आणि त्या पाठोपाठ संपूर्ण देशभर तरुणाईचा संताप उफाळला.
#WATCH | Alipurduar, West Bengal: Teacher Parimal Dey says, "I have decided to return the Banga Ratna award…I support the protest. The way she (Mamata Banerjee) is running the administration is not right." https://t.co/9KdclTMIJw pic.twitter.com/lTFC7FowE7 — ANI (@ANI) August 25, 2024
#WATCH | Alipurduar, West Bengal: Teacher Parimal Dey says, "I have decided to return the Banga Ratna award…I support the protest. The way she (Mamata Banerjee) is running the administration is not right." https://t.co/9KdclTMIJw pic.twitter.com/lTFC7FowE7
— ANI (@ANI) August 25, 2024
आता या संतापाचे रूपांतर पुरस्कार वापसीत झाले आहे. पश्चिम बंगालमधील शिक्षक परिमल डे यांना ममता बॅनर्जी सरकारने बंग रत्न पुरस्कार देऊन गौरविले होते. परिमल डे यांनी “बंग रत्न” पुरस्कार वापस करण्याचे ठरविले आहे. ममता बॅनर्जी यांच्या विषयी आपल्याला वैयक्तिक आदर आहे. त्यांच्याविषयी कोणताही आकस नाही, पण त्यांची प्रशासन चालवण्याची पद्धती योग्य नाही. डॉक्टर तरुणीवर बलात्कार झाल्याचे प्रकरण त्यांनी योग्य पद्धतीने हाताळलेले नाही. त्यामुळे त्यांच्या सरकारने दिलेला “बंग रत्न” पुरस्कार मी वापस करत आहे, असे परिमल डे यांनी सांगितले. Mamata Banerjee
मोदी सरकार विरुद्ध पुरोगामी साहित्यिकांनी चालवलेली पुरस्कार वापसीची चळवळ ममता बॅनर्जी यांना आवडली होती. त्यांनी त्या चळवळीला पाठिंबा दिला होता. परंतु, आता पुरस्कार वापसीचा पहिलाच झटका ममता बॅनर्जींना बसला आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App