JP Nadda : ममता बॅनर्जींनी क्रूरता आणि हुकूमशाहीच्या सर्व मर्यादा ओलांडल्या – जेपी नड्डा

JP Nadda

जनता त्यांचा अहंकाराचा चिरडून टाकेल, असा घणाघातही नड्डा यांनी केला आहे.


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा ( JP Nadda ) यांनी पश्चिम बंगालमधील डॉक्टर, तरुण आणि महिलांशी झालेल्या हिंसक कृत्यांचा निषेध केला असून, ममता बॅनर्जी यांनी राज्यात क्रूरता आणि हुकूमशाहीच्या सर्व मर्यादा ओलांडल्याचा आरोप केला आहे.

पश्चिम बंगाल पोलिसांच्या वृत्तीच्या विरोधात बंगाल बंदची माहिती देताना जेपी नड्डा म्हणाले की, भाजपने सकाळी 6 वाजल्यापासून 12 तासांसाठी बंगाल बंदची हाक दिली आहे आणि त्यांना खात्री आहे की बंगालची जनता ममता बॅनर्जींच्या अहंकाराचा चक्काचूर करेल.



जेपी नड्डा यांनी मंगळवारी पश्चिम बंगालच्या संदर्भात एक निवेदन जारी केले आणि म्हटले की, आज पश्चिम बंगालच्या रस्त्यावर ममता बॅनर्जी सरकार आणि त्यांच्या क्रूर पोलिसांकडून न्यायाची मागणी करणाऱ्या डॉक्टर, तरुण आणि महिलांवर दिसलेला हिंसाचार आणि अत्याचार हे केवळ निषेधार्हच नाही तर मानवतेलाही लाजवेल असे आहे. बंगालमध्ये मुलीसोबत क्रूरतेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या जातात – पण ममता बॅनर्जी गप्प आहेत, स्त्रीची ओळख पुसली जाते, पण ममता बॅनर्जी गप्प आहेत, मुलीच्या पालकांची दिशाभूल केली जाते – पण ममता बॅनर्जी गप्प आहेत.

Mamata Banerjee crossed all limits of brutality and dictatorship JP Nadda

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात