इतिहासाची पुनरावृत्ती : गांधी परिवाराच्या सूचक पाठिंब्याने मल्लिकार्जुन खर्गे काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत प्रचंड मतांनी विजयी

वृत्तसंस्था / प्रतिनिधी

नवी दिल्ली : काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत वरिष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे प्रचंड मतांनी विजयी झाले आहेत. मल्लिकार्जुन खर्गे यांना 7897 मते मिळाली, तर शशी थरूर यांना 1000 मते मिळाली थरूर यांच्यापेक्षा तब्बल 8 पट मते जास्त घेऊन मल्लिकार्जुन खर्गे काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजयी झाले आहेत. Mallikarjun Kharge won the Congress president election with a huge margin

या निवडणुकीत गांधी परिवाराने कोणत्याही उमेदवाराला अधिकृतपणे पाठिंबा दिला नव्हता. मात्र अध्यक्षपदाच्या उमेदवारी बाबत जे राजकारण झाले, त्यामध्ये अशोक गेहलोत यांच्या ऐवजी मल्लिकार्जुन खर्गे यांचे नाव समोर आले आणि त्यांनी निवडणुकीत अर्ज भरला, त्यावेळी गांधी परिवाराचा कल नेमका कोणत्या उमेदवाराकडे आहे हे स्पष्ट झाले आणि त्यातूनच मल्लिकार्जुन खर्गे यांची उमेदवारी अधिक मजबूत झाली.

 शरद पवारांची आठवण

काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसंदर्भात मुंबईत पत्रकारांशी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कालच सटीक भाष्य केले होते. त्यांनी त्यांच्या काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या आठवणी पत्रकारांना सांगितल्या होत्या. त्यावेळी काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत सीताराम केसरी आणि राजेश पायलट यांच्याशी त्यांचा सामना झाला होता. सीताराम केसरी हे देखील शरद पवारांच्या पेक्षा 7 पट जास्त मते मिळवून विजयी झाले होते. त्यावेळी सीताराम केसरी यांना 6500 पेक्षा जास्त मते मिळाली होती तर शरद पवारांना 836 मते मिळाली होती. राजेश पायलट यांना 325 मते मिळाली होती. या निवडणुकीवर भाष्य करताना शरद पवारांनी गांधी परिवाराचा सीताराम केसरी यांना पाठिंबा असल्याचे सूचक विधान केले होते. सीताराम केसरी यांना मिळालेली मते आणि शरद पवारांना मिळालेली मते यांच्यातील तफावत जेवढी मोठी होती, त्यापेक्षा जास्त तफावत मल्लिकार्जुन खर्गे आणि शशी थरूर यांच्या मतांमध्ये आहे. या राजकीय अर्थाने मल्लिकार्जुन खर्गे यांना गांधी परिवाराचा पाठिंबा असल्याचे सूचित होते.

 राहुल गांधींची “भूमिका” खर्गे ठरवणार

या खेरीस काँग्रेसच्या सर्वच वरिष्ठ नेत्यांनी काँग्रेसच्या नूतन अध्यक्षांना गांधी परिवाराचे ऐकावेच लागेल, असे अनेकदा स्पष्ट केले आहे. या पार्श्वभूमीवर देखील मल्लिकार्जुन खर्गे यांना गांधी परिवाराचा पाठिंबा असल्याचे सूचित होत आहे. शशी थरूर यांनी मल्लिकार्जुन खर्गे यांचे अभिनंदन केले असून त्यांच्या बरोबर सहयोगाने काम करण्याचे स्पष्ट केले आहे. त्याचबरोबर सध्या भारत जोडो यात्रेवर असलेले वरिष्ठ नेते खासदार राहुल गांधी यांनी देखील पक्ष संघटनेतील आपली भूमिका कोणती असावी हे आपण स्वतः निश्चित करणार नसून हे नूतन अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे ठरवतील असे म्हटले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मल्लिकार्जुन खर्गे यांच्या काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडीबद्दल त्यांचे अभिनंदन केले आहे.

Mallikarjun Kharge won the Congress president election with a huge margin

महत्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात