काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडीनंतर मल्लिकार्जुन खर्गेंचे पहिल्याच पत्रकार परिषदेत सोनिया + राहुलजींचे धन्यवाद

प्रतिनिधी

नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजयी झाल्यानंतर घेतलेल्या पहिल्याच पत्रकार परिषदेत नवनिर्वाचित अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांचे विशेष आभार मानले आहेत. काँग्रेसमध्ये सर्व नेते आणि कार्यकर्ते समान असून कोणी मोठे अथवा कोणीही लहान नाही. सर्वजण एकजुटीने देशातल्या हुकूमशाही विरुद्ध आणि फॅसिस्ट ताकदींविरुद्ध लढा उभारतील, अशी ग्वाही दिली आहे. Mallikarjun Kharge thanks Sonia + Rahulji in his first press conference after his election as Congress president

मल्लिकार्जुन खर्गे यांनी मोठ्या फरकाने काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत शशी थरूर यांचा पराभव केला. त्यानंतर त्यांनी काँग्रेस अध्यक्ष या नात्याने पहिली पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांनी सोनिया गांधी यांचे विशेष आभार मानले. सोनिया गांधी यांनी काँग्रेस अध्यक्षपदावरून 23 वर्षे पक्षाच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. त्यांच्या नेतृत्वाखाली दोन वेळा काँग्रेसचे केंद्रात सरकार बनले. अनेक राज्यांमध्ये काँग्रेसचे पुनरुज्जीवन झाले. सोनिया गांधींनी आपल्या रक्ताने आणि घामाने हो काँग्रेस पक्षाचे सिंचन केले आहे, अशा शब्दांमध्ये मल्लिकार्जुन खरगे यांनी सोनिया गांधी यांचे आभार मानले आहेत.

त्याचबरोबर राहुल गांधी सध्या भारत जोडो यात्रेत आहेत. त्यांनी वेळात वेळ काढून फोनवरून माझे अभिनंदन केले. त्यांच्या भारत जोडो यात्रेत भारत भारतातील प्रत्येक नागरिक सहभागी होऊन हुकूमशाही ताकदींविरुद्ध लढा उभारतो आहे. आम्ही सगळे त्या यात्रेत सहभागी होणार आहोत, असे मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले.

मल्लिकार्जुन खर्गे हे रिमोट कंट्रोल्ड अध्यक्ष आहेत, असा आरोप होत आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी घेतलेल्या पहिल्याच पत्रकार परिषदेत सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांचे आभार मानले आहेत. त्याच वेळी त्यांनी काँग्रेसमध्ये कोणीही मोठे अथवा लहान नाही याचाही खुलासा केला आहे.

Mallikarjun Kharge thanks Sonia + Rahulji in his first press conference after his election as Congress president

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात