मल्लिकार्जुन खरगे लोकसभा निवडणूक लढवण्याची शक्यता कमी, जावयाला उमेदवारी देण्याची चर्चा

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे लोकसभा निवडणुकीपासून दूर राहू शकतात. काँग्रेसच्या दुसऱ्या यादीच्या विचारमंथनाबाबत सोमवारी झालेल्या बैठकीनंतर खरगे यावेळी निवडणूक लढवणार नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. एनडीटीव्हीच्या वृत्तानुसार, खरगे यांची इच्छा आहे की त्यांनी काँग्रेसच्या निवडणूक प्रचाराचे नेतृत्व करावे आणि वैयक्तिक प्रचारात व्यग्र राहू नये.Mallikarjun Kharge is less likely to contest the Lok Sabha elections, there is talk of giving candidature to his son-in-law



7 मार्च रोजी झालेल्या काँग्रेस सीईसीच्या बैठकीत कर्नाटकातील गुलबर्गा येथून खरगे यांचे नाव निश्चित करण्यात आले. पक्षाने याची घोषणा केली नसली तरी खरगे आता त्यांचे जावई राधाकृष्ण दोड्डामणी यांना या जागेवरून उमेदवारी देऊ शकतात, असे सूत्रांचे म्हणणे आहे.

मल्लिकार्जुन खरगे यांनी 2009 आणि 2014च्या लोकसभा निवडणुकीत गुलबर्गा मतदारसंघातून विजय मिळवला होता. 2019 मध्ये त्यांचा भाजप नेते उमेश जाधव यांच्याकडून पराभव झाला होता. तेव्हापासून ते राज्यसभेचे खासदार आणि विरोधी पक्षनेते आहेत. त्यांच्या राज्यसभेच्या कार्यकाळात अजून चार वर्षे शिल्लक आहेत.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, खरगे यांच्याशिवाय काँग्रेसच्या चार माजी मुख्यमंत्र्यांनाही लोकसभा निवडणूक लढवायची नाही. यामध्ये अशोक गेहलोत, कमलनाथ, दिग्विजय सिंह आणि हरीश रावत यांच्या नावांचा समावेश आहे. तसेच राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनीही निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केलेली नाही.

Mallikarjun Kharge is less likely to contest the Lok Sabha elections, there is talk of giving candidature to his son-in-law

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात