छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलांचे मोठे यश, चकमकीत 10 नक्षलवादी ठार; शस्त्रास्त्रेही जप्त

वृत्तसंस्था

रायपूर : छत्तीसगडमधील बिजापूर जिल्ह्यात सुरक्षा दलाच्या जवानांसोबत झालेल्या चकमकीत एका महिलेसह १० नक्षलवादी ठार झाले. घटनास्थळावरून एक लाइट मशीनगन, एक .३०३ रायफल, एक १२ बोअरची बंदूक, मोठ्या प्रमाणात बॅरल ग्रेनेड लाँचर, गोळे, इतर शस्त्रे आणि दारूगोळा जप्त करण्यात आला आहे. नक्षलवाद्यांची ओळख अद्याप पटली नाही.Major success of security forces in Chhattisgarh, 10 Naxalites killed in encounter; Weapons were also seized



पोलिस महानिरीक्षक (बस्तर रेंज) सुंदरराज पी. यांनी सांगितले की, मंगळवारी पहाटे ६ वाजेच्या सुमारास गांगलूर पोलिस ठाण्यांतर्गत लेंद्रा आणि कोरचोली गावांमध्ये ही चकमक झाली. येथे सुरक्षा दलाच्या जवानांचे संयुक्त पथक नक्षलविरोधी अभियानावर होते. गोळीबार थांबल्यानंतर घटनास्थळावरून चार नक्षलवाद्यांचे मृतदेह सापडले आणि नंतर शोधकार्यात चकमकीच्या ठिकाणी आणखी सहा मृतदेह आढळले. नक्षलवादी दरवर्षी मार्च ते जून या काळात टॅक्टिकल काउंटर ऑफेन्सिव्ह मोहिमा राबवतात व आपल्या कारवाया तीव्र करतात. यापूर्वी २७ मार्च रोजी विजापूरच्या बासागुडा भागात सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत सहा नक्षलवादी ठार झाले होते.

Major success of security forces in Chhattisgarh, 10 Naxalites killed in encounter; Weapons were also seized

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात