सांगली + भिवंडी सोडली वाऱ्यावर; महाराष्ट्रातले काँग्रेस नेते आता टार्गेटवर!!

विशेष प्रतिनिधी

मुंबई : महाराष्ट्रातली महाविकास आघाडी वाचवण्याच्या नादात महाराष्ट्रातल्या काँग्रेस नेत्यांनी सांगली आणि भिवंडी सोडली वाऱ्यावर त्यामुळे आता हे नेते आधीच्या काँग्रेसच्या नेत्यांच्या टार्गेटवर आले आहेत. Major loss for Congress in saving MVA in maharashtra

महाराष्ट्रात गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर महाविकास आघाडीने 48 जागांचा पारवेला जाहीर केला त्यामध्ये काँग्रेसला फार मोठा “त्याग” करावा लागला. ठाकरे पवारांपुढे महाराष्ट्रातले काँग्रेस नेते झुकल्याचे चित्र निर्माण झाले. आता नेमका हाच मुद्दा उचलून धरून महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे विद्यमान राज्यसभा खासदार अशोक चव्हाण यांनी महाराष्ट्रातल्या काँग्रेस नेतृत्वाला टार्गेट केले आहे. महाराष्ट्रातले काँग्रेसचे नेतृत्व कमकुवत आहे त्यांनी सांगली आणि भिवंडीची हक्काची जागा सोडून गेली. आपण असतो तर हे घडू दिले नसते, अशा शब्दांमध्ये अशोक चव्हाणांनी काँग्रेस नेत्यांना डिवचले आहे.


विशाल पाटलांना अन्य मार्गाने संसदेत पाठवू; पण सांगलीत शिवसेनेचा उमेदवार लढवू; संजय राऊतांची स्पष्टोक्ती


तिकडे सांगलीत विशाल पाटील यांनी अस्वस्थ होऊन सांगलीच्या मैदानात अपक्ष म्हणून करण्याची तयारी चालवली आहे. राज्य पातळीवरच्या काँग्रेस नेत्यांना काय निर्णय घ्यायचा तो ते घेवोत, पण सांगलीची जागा आम्ही लढवणारच अशी भूमिका विशाल पाटील यांनी जाहीर केली. त्यामुळे ते आता सांगलीतून अपक्ष उमेदवारीची तयारी करत आहेत. त्यामुळे एकीकडे महाविकास आघाडी टिकवण्यासाठी आपल्या हक्काच्या जागांचा काँग्रेसला “त्याग” करावा लागला, तर दुसरीकडे आपल्याच नेत्यांचा रोष सहन करावा लागला आहे.

दुसरीकडे महाविकासाकडे ठाकरे आणि पवारांची स्थिती देखील फारशी चांगली नाही. शरद पवारांना त्यांच्या राजकीय कारकीर्दीतले सर्वाधिक कमी जागा वाटायला आल्या. त्यांचा पक्ष फक्त 10 जागा लढवणार आहे, पण तेवढे देखील उमेदवार पवारांना अद्याप जाहीर करता आलेले नाहीत. पवारांच्या पक्षाचा सातारा, माढा आणि रावेर या तीन मतदारसंघांचा तिढा अद्याप सुटलेला नाही. ठाकरेंनी मात्र आपल्या वाट्याला आलेले 21 उमेदवार जाहीर करून आघाडी घेतली असली तरी त्यांची प्रत्यक्षात प्रचाराला सुरुवात व्हायची आहे.

Major loss for Congress in saving MVA in maharashtra

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात