विशाल पाटलांना अन्य मार्गाने संसदेत पाठवू; पण सांगलीत शिवसेनेचा उमेदवार लढवू; संजय राऊतांची स्पष्टोक्ती

Shiv Sena candidate will contest in Sangli

विशेष प्रतिनिधी

सांगली : वसंतदादा पाटलांचे पणतू विशाल पाटलांना अन्य मार्गाने संसदेत पाठवू, पण सांगलीमध्ये चंद्रहार पाटलांच्या रूपाने शिवसेनेचाच उमेदवार लढवू, अशी स्पष्टोक्ती संजय राऊत यांनी सांगलीमध्ये आल्याबरोबर केली. पण या स्पष्टोक्तीतून त्यांनी विशाल पाटलांना दिलासा देण्याचाही प्रयत्न केला. Shiv Sena candidate will contest in Sangli

संजय राऊत हे आजपासून 3 दिवस सांगली दौऱ्यावर आहेत. सांगलीत पोहोचताच पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, की विशाल पाटील हे वसंतदादांचे पणतू असल्याने त्यांच्याविषयी शिवसेनेला यांच्या संदर्भात आस्था आहे. त्यांना संसदेत पाठवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. सांगलीतले आणि राज्यातील काँग्रेसचे नेतृत्व हे त्या भागातील कार्यकर्त्यांची समजूत काढतील. विशाल पाटील संसदेत कसे जातील याची काळजी आणि त्यासाठी पुढाकार शिवसेना घेईल. सांगलीच्या बाबतीत काँग्रेसशी अनेक पर्यायांची चर्चा, पण सांगली लोकसभा आम्हीच लढणार आहे. मी त्यांच्या भावनेशी सहमत आहे . प्रत्येक ठिकाणी प्रत्येक मतदारसंघात आघाडी असते तो मतदारसंघ आपल्यासाठी सुटावा अशी कार्यकर्त्यांची इच्छा मनोमन असते.



रामटेक हा आमचा परंपरागत मतदारसंघ आहे. शिवसैनिकांना वाटत होते की तो मतदारसंघ आमच्याकडे असावा पण आम्ही त्यांची समजूत काढली आणि तो मतदारसंघ काँग्रेसला दिला. छत्रपती शाहू महाराजांसाठी कोल्हापूर मतदारसंघ आम्ही काँग्रेसला दिला. आमच्याही कार्यकर्त्यांचा त्या ठिकाणी हट्ट होता पण आम्ही त्याची समजूत काढली. महाराष्ट्रात किमान 35 + जागा निवडून आणण्याचा मिशन आहे. त्यासाठी प्रत्येकाने एकमेकांना हातभार लावला पाहिजे, असेही राऊत म्हणाले.

चंद्रहार पाटलांचाच विजय निश्चित

कुणी कितीही डरकाळी फोडल्या तरी महाविकास आघाडीला कोणी रोखू शकत नाही. सांगलीमध्ये आमचे उमेदवार चंद्रहार पाटील हे फार आधीच प्रचाराला लागलेले आहेत. मिरजेमध्ये शिवसेना पक्षप्रमुखांची प्रचंड सभा झाली. आदित्य ठाकरे देखील जाणार आहेत. आज उद्या परवा मी देखील त्या भागात जाणार आहे. चंद्रहार पाटलांचाच विजय निश्चित होणार आहे, असा दावा राऊत यांनी केला.

Shiv Sena candidate will contest in Sangli

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात