बिहारचा राजकारणातला खरा सरप्राईज एलिमेंट आणला विनोद तावडेंनी; मैथिली ठाकूरच्या एन्ट्रीने फिरवला गेम!!

देशभरातल्या वेगवेगळ्या बातम्यांच्या धबडग्यात आणि मेरी सेटिंग मध्ये खऱ्या गेमा कुणाच्याच लक्षात येत नाहीत. अशी खरी गेम बिहारच्या राजकारणात घडली आहे बिहारच्या राजकारणातला खरा सरप्राईज एलिमेंट विनोद तावडे यांनी आणत मैथिली ठाकूरच्या एंट्रीने गेम फिरवला आहे. Maithili Thakur

देशभरात सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर (न) फेकलेला जोडा, राहुल गांधींचा दक्षिण अमेरिका दौरा, तिथे त्यांनी केलेली भारत विरोधी वक्तव्य या विषयावर चर्चा सुरू असताना बिहार विधानसभेची निवडणूक जाहीर झाली आणि त्या पाठोपाठ भाजपचे सरचिटणीस आणि बिहार प्रभारी विनोद तावडे यांनी तरुण लोकगायिका मैथिली ठाकूर हिची एन्ट्री बिहारच्या राजकारणात केली. स्वतः विनोद तावडे यांनी ट्विट करेपर्यंत या बातमीची भनक सुद्धा सर्व माध्यमांना लागली नव्हती. बिहारचे पठाडीबद्ध राजकारण बदलायचे असेल, तर नव्या माणसांना त्यात एंट्रीने दिली पाहिजे, हे लक्षात घेऊन भाजपने 25 वर्षांच्या मैथिली ठाकूरची एन्ट्री बिहारचा राजकारणात करून दिली. विनोद तावडे यांचे ते ट्विट आल्यानंतर मैथिली ठाकूर हिनेदेखील बिहार विधानसभा निवडणूक तिचे स्वतःचे गाव मधुबनी जिल्ह्यातील बेनिपट्टी इथून निवडणूक लढवायची इच्छा व्यक्त केली.

– कुचंबलेले राजकारण मोकळे करण्यासाठी…

बिहारचे राजकारण नीतीश कुमार आणि लालूप्रसाद यादव यांच्यातच कुचंबले असताना सुरुवातीला भाजपने त्याच्यात शिरकाव केला काँग्रेसचे वर्चस्व पूर्ण मोडून काढले अगदी काँग्रेसच्या राहुल गांधींनी आयडियाची कल्पना लडवून कन्हैया कुमारची एन्ट्री बिहारच्या राजकारणात करून दिल्यानंतर सुद्धा तिथल्या राजकारणात फार मोठा कुठला बदल घडला नाही तिथल्या राजकारणाची कोंडी फुटली नाही. कन्हैया कुमारच्या नुसत्याच आक्रस्ताळ्या भाषणांनी बिहार मधल्या काँग्रेसला सुद्धा नवी संजीवनी मिळाली नाही. त्यामुळे बिहारच्या राजकारणात मोठे परिवर्तनही घडले नाही. कारण नितीश कुमार लालूप्रसाद यादव किंवा काँग्रेस अगदी भाजपने सुद्धा राज्यातले नवे नेतृत्व विकसित करायचा फारसा यशस्वी प्रयत्न केला नाही.

– घिसेपिटे चेहेरेच नकोत

या पार्श्वभूमीवर 25 वर्षाची लोकगायिका मैथिली ठाकूर हिची एन्ट्री बिहारच्या राजकारणासाठी मोठे सरप्राईज एलिमेंट ठरू शकते. 1995 मध्ये लालूप्रसाद यादव यांची राजवट सुरू झाल्यानंतर मैथिली ठाकूरचे कुटुंब बिहार सोडून बाहेर गेले. ते आता बिहारमध्ये परत आले असून मैथिलीला राजकारणातून बिहार साठी काहीतरी करायचे आहे, असे ट्वीट करून विनोद तावडे यांनी तिच्या निवडणूक लढविण्याच्या इराद्याला बळ दिले. तिच्या निमित्ताने संपूर्ण नवा चेहरा बिहारच्या राजकारणात आणला. नितीश कुमार, तेजस्वी यादव, कन्हैया कुमार यांच्यासारख्या घिस्यापिट्या चेहऱ्यांसमोर मैथिलीचा चेहरा नवीन असला तरी तो कितीतरी उजळ आहे. त्या चेहऱ्याचा वापर करून बिहारमध्ये भाजपला दणकेबाज यश मिळवायचे आहे. तिथे एकाच वेळी दोन प्रादेशिक पक्षांची सत्ता संपवायची आहे. नितीश कुमार यांच्या जदयूला बरोबर घेतले तरी त्यांच्या पक्षाचे वर्चस्व मोडून स्वतःचे नव वर्चस्व निर्माण करायचे आहे. यासाठी मैथिली ठाकूरच्या नवीन चेहऱ्याचा उत्तम राजकीय वापर करण्याचा मार्ग भाजपने पत्करला आहे.

– मैथिलीच्या ग्लॅमरचा वापर

याचा अर्थ मैथिली ठाकूरला भाजप मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून पुढे करेल अशी शक्यता नाही, त्या उलट तिला राजकारणात आणून तिला व्यवस्थित groom करून मग तिच्यावर भाजप वेगळे राजकीय प्रयोग करण्याची शक्यता आहे, पण तिच्या बिहारच्या राजकारणातल्या एन्ट्रीच्या निमित्ताने तरुण मतदारांना आकर्षित करण्यासाठी त्याचबरोबर बिहारच्या राजकारणाला नवीन वळण लावण्यासाठी मैथिली ठाकूरच्या ग्लॅमरचा उपयोग करून घेण्याचा भाजपचा इरादा दिसतो आहे.

Maithili Thakur enters in Bihar politics

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात