विशेष प्रतिनिधी
मुंबई : जम्मू काश्मीर मध्ये 370 कलम रद्द केल्यानंतर केंद्र आणि राज्य सरकारांची जी प्रचंड विकास कामे सुरू आहेत, त्याला खोडा घालण्याचा इरादा जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री अमर अब्दुल्ला यांनी बोलून दाखविला. जम्मू-काश्मीरमध्ये महाराष्ट्र भवनाचे बांधकाम सुरू आहे, पण ते आम्ही बांधू देणार नाही, अशी दमदाटी उमर अब्दुल्ला यांनी काश्मीर मधले एका प्रचार सभेत केली. ही प्रचार सभा होऊन 24 तास उलटले तरी ओमर अब्दुल्लाने दिलेल्या धमकीवर उद्धव ठाकरे आणि शरद पवार गप्प आहेत. Maharashtra will not allow building in Jammu and Kashmir
जम्मू – कश्मीर मध्ये श्रीनगर विमानतळापासून जवळच बडगांमध्ये महाराष्ट्र शासनाने अडीच एकर जागा विकत घेऊन त्याचे महाराष्ट्र भवन बांधायचा निर्णय घेऊन त्याचे कामही सुरू केले आहे. जम्मू कश्मीर मध्ये महाराष्ट्रातून जाणाऱ्या पर्यटकांसाठी उत्तम सोय असलेले महाराष्ट्र भवन बांधण्याचा शासनाचा इरादा आहे. परंतु “इंडिया” आघाडीचा घटक पक्ष असलेल्या नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांनी स्थानिक हॉटेलवर हॉटेलच्या व्यवसायांवर परिणाम होतो या नावाखाली महाराष्ट्र भवनाचे बांधकाम बंद पाडण्याचा चंग बांधला आहे. त्यातूनच उमर अब्दुल्लांचे महाराष्ट्र भवन बांधू देणार नाही हे फुत्कार बाहेर पडले.
काश्मीर खोऱ्यात प्रचार सभेत बोलताना त्यांनी 370 कलमाच्या मुद्द्यावरून आगपाखड केली. आमचे सरकार राज्यात परत आल्यावर 370 कलम परत आणू. इतकेच नाहीतर सध्या मोठमोठ्या इमारतींचे बांधकाम सुरू आहे ते बांधकामही आम्ही बंद पाडू, अशी धमकी उमर अब्दुल्लांनी दिली. या मोठ्या इमारतीच्या बांधकामांमध्येच महाराष्ट्र भवनाच्या बांधकामाचा समावेश आहे तेच बंद पाडण्याची धमकी अब्दुल्लांनी दिली.
एकनाथ शिंदेंचा इशारा
उमर अब्दुल्ला यांनी दिलेल्या धमकीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली. जम्मू काश्मीर मधून 370 कलम हटले आहे. त्यामुळे ते परत लागू करण्याची भाषा कोणी करू नये. महाराष्ट्र भवनाचे बांधकाम बंद पाडण्याची धमकी कोणी देऊ नये ती सहन केली जाणार नाही, असा इशारा एकनाथ शिंदे यांनी दिला. पण त्याचवेळी उमर अब्दुल्लांच्या धमकीवर उद्धव ठाकरे आणि शरद पवार का गप्प आहेत?? त्यांना देखील महाराष्ट्र भवनाचे बांधकाम जम्मू – काश्मीरमध्ये व्हायला नको आहे का??, असा खोचक सवालही त्यांनी केला.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App