अजितदादांवरच्या “नालायक” टीकेला बारामतीकरांचे प्रत्युत्तर; श्रीनिवास बापू तुम्ही फक्त अजितदादांचे छोटे भाऊ म्हणून मिरवलात!!

विशेष प्रतिनिधी

पुणे :  बारामती लोकसभा निवडणुकीच्या लढतीत उपमुख्यमंत्री अजित पवार हे पवार कुटुंबात एकटे पडले. अजितदादांच्या धाकट्या भावाने देखील त्यांची साथ सोडली, अशा बातम्या श्रीनिवास पवारांच्या भाषणानंतर सर्वत्र आल्या. श्रीनिवास पवारांच्या भाषणावर अजित पवारांच्या प्रतिक्रिया आल्या नाहीत, पण अजित पवारांच्या समर्थकांनी मात्र श्रीनिवास पवारांच्या भाषणाला प्रत्युत्तर देणारे पत्र व्हायरल केले.Baramatikar’s response to “worthless” criticism of Ajitdad; Srinivasa Bapu you only mirrored Ajitdad’s younger brother!!



हे पत्र असे :

सुज्ञ बारामतीकरांचे मत

बोलाचाच भात आणि बोलाचीच कढी – खोटा सहानुभूतीदार

श्रीनिवास बापू नालायक हा शब्द आपण किती सहज वापरला … पण हा शब्द वापरत असताना आपण सोईस्करपणे का विसरलात की आपण आजपर्यंत आपल्या बारामतीसाठी, समाजासाठी काय केले??, एका बाजूला समाजा प्रति आपण काय तरी देणं लागतो, ह्याकडे डोळाझाक करून, दुसरीकडे मात्र केवळ अजितदादांचे छोटे बंधू म्हणून स्वतःला फक्त मिरवायचे काम केले.

वास्तविक पाहता कुठलीही व्यक्ती राजकारण, समाजकारण किंवा आपला व्यवसायामध्ये स्वकर्तुत्व आणि जिद्दीच्या जोरावर आपला ठसा उमटावते, अजितदांदाकडे पाहिले तर ते सर्वच क्षेत्रात त्यांनी आपला ठसा उमटवला आहे. आज अजितदादा पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत काम करतात, जनतेमध्ये मिसळतात त्यांची कामे मार्गी लावतात, हे बारामतीकरांच्या बरोबर संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे आणि त्यांची कबुली इतर मान्यवरांच्या बरोबर खुद्द पवार साहेबांनी वेळोवेळी दिली आहे.

बापू तुम्ही बोलताना म्हणाला की, मला पण पवार साहेबांसारखे काका मिळाले पाहिजे होते, पण तुम्ही हे विसरलात की फक्त काका मिळून चालत नाही, तर त्या कसोटीला उतरण्यासाठी कर्तृत्व, दातृत्व आणि नेतृत्व गुण असावे लागतात.

पण आज अचानक सपत्नीक पुढे येऊन अजितदादांच्या बद्दल जे मत व्यक्त केले आहे, त्यामध्ये कुठला तरी स्वार्थ नक्कीच लपलेला आहे, अशी शंका उपस्थित होते. कारण दादांच्या अनेक निर्णयाबरोबर आपण दादांच्या बरोबर दिसला होता.

बारामतीकर म्हणून असे वाटते की, तुम्ही एकतर अजितदादांना कायम व्हीलन करणाऱ्या लोकांच्या हातातील खेळणं झाला असावे किंवा आपल्या बायको-पोरांच्या असणाऱ्या राजकीय महत्वकांक्षापोटी आपण हे पाऊल टाकले असावे.

शेवटी आम्ही बारामतीकर म्हणून नक्की सांगतो की, आम्ही घोगडं भिजवत ठेवणाऱ्या खोटी सहाभूतीदार लोकांच्या मागे न उभा राहता प्रत्येक्षात विकास करणाऱ्या विकास पुरुषाच्या मागे म्हणजेच अजितदादांच्या मागे ठामपणे उभे राहणार आहोत.

….आणि श्रीनिवासबापू आमचं ठरलंय “घड्याळ तेच वेळ नवी”

Baramatikar’s response to “worthless” criticism of Ajitdad; Srinivasa Bapu you only mirrored Ajitdad’s younger brother!!

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात