उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले विशेष अभिनंदन
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : महाराष्ट्र NCC सलग तिसऱ्यांदा ‘प्रधानमंत्री बॅनर’ विजेते पदाचा बहुमान पटकावून महाराष्ट्राचा मान वाढवला आहे. याबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद फडणवीस यांनी महाराष्ट्र एनसीसीचे विशेष अभिनंदन केले आहे.Maharashtra NCC won the title of Prime Minister Banner for the third time in a row
देवेंद्र फडणवीस म्हणातात, ‘सलग तिसऱ्यांदा ‘प्रधानमंत्री बॅनर’ विजेते पदाचा बहुमान पटकावणाऱ्या महाराष्ट्र एनसीसी संचालनालयाचे हार्दिक अभिनंदन! काल 27 जानेवारी रोजी करिअप्पा संचलन मैदानावर आयोजित पंतप्रधानांच्या रॅलीमध्ये, मा. पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या हस्ते पंतप्रधान ध्वज मिळवून आपण संपूर्ण महाराष्ट्राचीच मान अभिमानाने उंचावली आहे.’
‘महाराष्ट्र एनसीसी संचालनालयाला यापूर्वी एकूण 19 वेळा प्रधानमंत्री बॅनरचा बहुमान मिळाला आहे. यावर्षीही महाराष्ट्राने हा बहुमान मिळविल्याने राज्याला तब्बल आठ वर्षाने सलग तीन वर्ष प्रधानमंत्री बॅनर पटकावून उत्तम कामगिरी केली आहे.’
‘महिनाभर चाललेल्या शिबिरात छात्रसैनिकांनी कवायती, राजपथ संचलन, पंतप्रधानांना मानवंदना, पंतप्रधानांच्या रॅलीचे नियोजन, फ्लॅग एरिया ब्रीफिंग आणि सांस्कृतिक कार्यक्रम अशा विविध स्पर्धांमध्ये सर्वोत्तम कामगिरी केली. संपूर्ण शिबिरात सर्व स्पर्धांमध्ये सातत्यपूर्ण उत्कृष्ट कामगिरीमुळे एनसीसी महाराष्ट्राला सर्वोत्कृष्ट संचालनालयाचा हा मान मिळाला आहे. एनसीसी महाराष्ट्राची शिस्त, सातत्य आणि समर्पण नव्या पिढीसाठी प्रेरणादायी आहे!’
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App