वृत्तसंस्था
नवी दिल्ली : केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने देशातील सात राज्यांत १४३ समर्पित खेलो इंडिया केंद्रे सुरू करण्यास मंजुरी दिली असून, त्यासाठी १४.३० कोटी रुपये निधी मंजूर केला आहे. या प्रत्येक केंद्रात एका क्रीडा प्रकाराचे प्रशिक्षण दिले जाईल. महाराष्ट्रासह, मिझोराम, गोवा, कर्नाटक, मध्य प्रदेश, अरुणाचल प्रदेश आणि मणिपूर येथे ही केंद्रे स्थापन केली जाणार आहेत, अशी माहिती केंद्रीय क्रीडा मंत्री किरेन रिजिजू यांनी दिली. Maharashtra: 36 Khelo India Centres To Be Opened In 30 Districts
महाराष्ट्रातील तीस जिल्ह्यांत ३६ खेलो इंडिया केंद्रे स्थापन केली जाणार असून, त्यासाठी ३.६० कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे.
मिझोराममध्ये २, अरुणाचल प्रदेशमध्ये ५२, मध्य प्रदेशात ४, कर्नाटकात ३१, मणिपूरमध्ये १६ आणि गोव्यात २ खेलो इंडिया केंद्रे सुरू केली जाणार आहेत. देशात तळागाळापर्यंतच्या खेळाडूंना उत्तम दर्जाचे क्रीडा साहित्य आणि सुविधा तसेच प्रशिक्षण मिळवून देण्याच्या हेतूने ही केंद्रे सुरू करण्यात आली.
या क्रीडा उपक्रमांतून निष्णात खेळाडूंची निवड करू शकतो. क्रीडा मंत्रालयाने येत्या चार वर्षांत अशी एक हजारपेक्षा अधिक क्रीडा केंद्रे सुरू करण्याची योजना तयार केली आहे. आतापर्यंत २१७ क्रीडा केंद्रे स्थापन झाली असून, ईशान्य भारतातील राज्ये, जम्मू-कश्मीर, अंदमान निकोबार आणि लडाख या सर्व ठिकाणी प्रत्येक जिल्ह्यात अशी प्रत्येकी दोन केंद्रे सुरू केली जाणार आहेत, असे रिजीजू यांनी स्पष्ट केले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App