विशेष प्रतिनिधी
भोपाळ : मध्य प्रदेशातील दतिया जिल्ह्यात पुरात अडकलेल्यांना गावकऱ्यांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी मध्य प्रदेशचे गृह मंत्री डॉ. नरोत्तम मिश्रा यांनी दाखविलेल्या धाडसाचे कौतुक होत आहे. मिश्रा स्वत: मोटरबोट घेऊन पुराच्या पाण्यात गेले. मोटरबोटीवर झाड पडल्याने हेलिकॉप्टर बोलावले. सर्व गावकºयांना सुरक्षित बाहेर काढून शेवटी ते हेलिकॉप्टरमध्ये बसले.Madhya Pradesh Home Minister dares to rescue flood victims
कोटरा गाव आणि त्याजवळीलच गोरा चौकी भागात काही लोक पुराच्या पाण्यात अडकल्याची माहिती मिळाली होती, असे पोलीस अधीक्षक अमनसिंह राठोड यांनी सांगितले. गृहमंत्री डॉ. नरोत्तम मिश्रा हे स्वत: बोट घेऊन त्याठिकाणी पोहोचले होते.
मात्र, त्या मोटारबोटीवर झाड कोसळले होते. त्यामुळे एक तार फसल्याने ती बोट पाण्यातच बंद पडली होती. या बोटीत एवढे लोक नेणे धोक्याचं असल्याने गृहमंत्र्यांनी हेलिकॉप्टर बोलावले होते. हेलिकॉप्टर आल्यानंतर गृहमंत्र्यांनी सर्वप्रथम पुरात अडकलेल्या सात लोकांना एअरलिफ्ट केले.
त्यानंतर, ते स्वत: वायू दलाच्या जवानांच्या मदतीने सुखरुपपणे पाण्यातून बाहेर निघाले. यावेळी, गृहमंत्र्यांसमोरच एक वयोवृद्ध आजोबा मोठमोठ्याने रडू लागले होते. त्यावेळी, तुम्हाला आधी बाहेर काढेल, त्यानंतरच मी बाहेर जाईल, असा विश्वास डॉ. मिश्रा यांनी दिला. गृहमंत्र्यांच्या या धाडसी बाण्याचे सध्या सोशल मीडियातून कौतुक होत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App