Madhya Pradesh भाजप आणि काँग्रेसमध्ये थेट लढत, कोणाच्या बाजूने लागणार निकाल? Madhya Pradesh
विशेष प्रतिनिधी
भोपाळ : Madhya Pradesh मध्य प्रदेशातील बुधनी आणि विजयपूर विधानसभेच्या पोटनिवडणुकीची आज मतमोजणी होणार आहे. या जागांवर सत्ताधारी भाजप आणि विरोधी काँग्रेसमध्ये लढत आहे. मतमोजणीसाठी सर्व तयारी पूर्ण झाली आहे. अधिकाऱ्याने सांगितले की, विजयपूर जागेसाठी मतमोजणी जिल्हा मुख्यालय श्योपूरच्या शासकीय पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये केली जाईल आणि संपूर्ण प्रक्रिया 21 ‘फेऱ्या’मध्ये पूर्ण केली जाईल. Madhya Pradesh
माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी सोडलेल्या बुधनी जागेसाठीची मतमोजणी शासकीय महिला पॉलिटेक्निक कॉलेज, जिल्हा मुख्यालय सिहोर येथे होणार असून, 13 ‘फेऱ्या’मध्ये मतमोजणी पूर्ण होणार असल्याचे त्यांनी सांगितले. मतमोजणी केंद्रांवर त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे.Madhya Pradesh
Delhi High Court : मद्य धोरणप्रकरणी दिल्ली हायकोर्टाचा केजरीवालांना दिलासा, ईडीला नोटीस
13 नोव्हेंबर रोजी विजयपूर आणि बुधनी जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत अनुक्रमे 77.85 टक्के आणि 77.32 टक्के मतदान झाले होते. काँग्रेसचे विद्यमान आमदार रामनिवास रावत यांनी राजीनामा देऊन सत्ताधारी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे विजयपूरमधील पोटनिवडणूक आवश्यक होती. पुढे त्यांना मोहन यादव मंत्रिमंडळात मंत्री करण्यात आले. रावत यांनी काँग्रेसचे आदिवासी नेते मुकेश मल्होत्रा यांच्या विरोधात निवडणूक लढवली आहे.
विदिशाचे विद्यमान भाजप आमदार आणि माजी मुख्यमंत्री चौहान यांची जूनमध्ये लोकसभेवर निवड झाल्यानंतर बुधनी जागा रिक्त झाली होती. चौहान यांचा नंतर केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश करून कृषी खात्याचा महत्त्वाचा कार्यभार देण्यात आला. चौहान यांचे निकटवर्तीय रमाकांत भार्गव यांनी बुधनीमध्ये माजी राज्यमंत्री आणि काँग्रेसचे उमेदवार राजकुमार पटेल यांच्याविरोधात निवडणूक लढवली आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App