लुधियाना जिल्हा न्यायालय संकुलात २३ डिसेंबर रोजी झालेल्या बॉम्बस्फोटप्रकरणी शीख फॉर जस्टिस (SFJ)या खलिस्तानी संघटनेचा सदस्य जसविंदर सिंग मुलतानी याला नुकतीच जर्मनीतून अटक करण्यात आली आहे. या हल्ल्यात एकाचा मृत्यू झाला, तर 5 जण जखमी झाले. जर्मनीमध्ये अटक करण्यात आलेला खलिस्तानी समर्थक जसविंदर सिंग मुलतानी याच्या चौकशीत पंजाबमधील निवडणुकीपूर्वी जातीय हिंसाचार पसरवण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न असल्याचे समोर आले आहे. Ludhiana Blast Jaswinder arrested from Germany reveals Pakistan plotted communal violence before Punjab elections
वृत्तसंस्था
नवी दिल्ली : लुधियाना जिल्हा न्यायालय संकुलात २३ डिसेंबर रोजी झालेल्या बॉम्बस्फोटप्रकरणी शीख फॉर जस्टिस (SFJ)या खलिस्तानी संघटनेचा सदस्य जसविंदर सिंग मुलतानी याला नुकतीच जर्मनीतून अटक करण्यात आली आहे. या हल्ल्यात एकाचा मृत्यू झाला, तर 5 जण जखमी झाले. जर्मनीमध्ये अटक करण्यात आलेला खलिस्तानी समर्थक जसविंदर सिंग मुलतानी याच्या चौकशीत पंजाबमधील निवडणुकीपूर्वी जातीय हिंसाचार पसरवण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न असल्याचे समोर आले आहे.
जसविंदर सिंग मुलतानी याला जर्मन पोलिसांनी अटक करून काल न्यायालयात हजर केले. जसविंदरने न्यायालयाला सांगितले की, ‘पाकिस्तान पंजाब आणि भारताच्या इतर भागात निवडणुकांपूर्वी हिंसाचार पसरवण्याचा कोणत्याही प्रकारे प्रयत्न करत आहे. त्यांना जनता सरकारच्या विरोधात जाईल, अशी परिस्थिती निर्माण करायची आहे. भारतीय एजन्सी जसविंदरसिंग मुलतानीला बोलावून हवी तेव्हा त्याची चौकशी करू शकतात, मात्र सध्या त्याला तुरुंगात पाठवण्याची गरज नसल्याचे जर्मन न्यायालयाने म्हटले आहे.
पंजाब पोलिसांच्या डीजीपींनी यासंदर्भात एक मोठी माहिती माध्यमांना दिली आहे. लुधियानामध्ये झालेला स्फोट पाकिस्तानी गुप्तचर संस्था ISIच्या सांगण्यावरून झाला आणि केवळ पंजाबमधील लुधियानाच नव्हे, तर देशातील इतर अनेक शहरेही या स्फोटाचे लक्ष्य होती. पंजाबमध्येही निवडणुका लवकर होणार असल्याने आयएसआयला प्रथम येथे अस्थिरता पसरवायची आहे. या स्फोटाशी संबंधित एका खलिस्तानी दहशतवाद्याला जर्मनीत पकडण्यात आले असून, त्याच्या चौकशीत अनेक गुपिते उघड झाली आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App