विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली: पेट्रोलियम कंपन्यांनी व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किंमतीत ४३ रुपयांची वाढ केली आहे. आता दिल्लीतील १९ किलोच्या व्यावसायिक सिलेंडरची किंमत आता १७३६.५० रुपये झाली आहे. नवीन दर आजपासून लागू होतील. घरगुती एलपीजी सिलिंडरच्या दरांमध्ये मात्र कोणताही बदल झालेला नाही.LPG cylinder price hiked by Rs 43; Commercial gas cylinder in nine months Rs 404 more expensive, no increase in domestic cylinders
महिन्याभरापूर्वी म्हणजेच १ सप्टेंबर रोजी व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत ७५ रुपयांची वाढ करण्यात आली होती. गेल्या नऊ महिन्यांत ४०४ रूपयांची वाढ झाली आहे. डिसेंबर २०२० मध्ये इंडेनच्या व्यावसायिक गॅस सिलेंडरची किंमत १३३२ रूपये इतकी होती.ती आता १७३६ रूपयांवर जाऊन पोचली आहे.
व्यावसायिक गॅस सिलेंडरचा वापर हा हॉटेल्स, ढाबे आणि सार्वजनिक भोजनालयांमध्ये अधिक होतो. त्यामुळे, आता दर वाढल्याने हॉटेलिंग महाग होऊ शकते. सर्वसामान्यांसाठी दिलासादायक बाब म्हणजे विनाअनुदानित घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किंमती ८८४.५० रुपयांवर स्थिर आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App