जम्मू – काश्मीर मधल्या विजयापेक्षा हरियाणातला पराभव काँग्रेसच्या जिव्हारी; महाराष्ट्रात ठाकरे + पवारांना कुरघोडीची संधी!!

maharashtra

नाशिक : जम्मू कश्मीर मध्ये तब्बल 10 वर्षांनंतर अब्दुल्ला परिवाराच्या नॅशनल कॉन्फरन्सच्या साथीने गांधी परिवाराच्या काँग्रेसने सत्ता मिळवली. पण या विजयातल्या आनंदापेक्षा काँग्रेसला हरियाणातला पराभव जिव्हारी लागला आहे, पण त्यामुळे महाराष्ट्रात ठाकरे + पवारांना जागावाटपाच्या चर्चेत काँग्रेसवर कुरघोडी करण्याची संधी मिळणार आहे.

जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस यांनी युती केली त्याचा मोठा लाभ नॅशनल कॉन्फरन्सला झाला. नॅशनल कॉन्फरन्स 90 पैकी तब्बल 52 जागांवर आघाडीवर आली. काँग्रेसला देखील 8 जागा मिळून काँग्रेसचा सत्तेमध्ये वाटा निर्माण झाला. पण काही झाले तरी काँग्रेसला अब्दुल्ला परिवारामुळे म्हणजेच प्रादेशिक पक्षाच्या आधारामुळे सत्ता मिळाली हे चित्र त्यामुळे निर्माण झाले.

त्याउलट हरियाणा मध्ये काँग्रेस सत्तेवर येणार अशी वातावरण निर्मिती पक्षाच्या नेत्यांनी केलीच होती. त्यामध्ये एक्झिट पोलच्या निष्कर्षाने भर घातली होती. काँग्रेसला 44 ते 54 जागा मिळतील, असा निष्कर्ष एक्झिट पोलने काढला होता. त्यानंतर काँग्रेस नेत्यांनी आपण 90 पैकी 60 च्या वर जागा जिंकून सत्तेवर येऊ, असा दावा सातत्याने केला होता.

पण प्रत्यक्ष मतमोजणीच्या ट्रेंड्स मधून हरियाणातील सगळे चित्र फिरले. भाजपनेच बहुमताचा आकडा ओलांडून 50 चा आकडा गाठला. भाजप सलग तिसऱ्यांदा सत्तेवर येणार हे चित्र अधोरेखित झाले. काँग्रेसला 35 जागांवर समाधान मानावे लागले. हरियाणात काँग्रेसला स्वबळावर सत्ता आणता आली नाही. भाजपवर अँटी इन्कमबन्सीचा मुद्दा उलटवता आला नाही. काँग्रेसमधल्या गटबाजीने पक्षाचा घात केला, वगैरे नॅरेटिव्ह तयार व्हायला सुरुवात झाली.

त्याचा परिणाम आता महाराष्ट्रातल्या जागा वाटपात काँग्रेसला सहन करावा लागण्याची शक्यता आहे. हरियाणातील एक्झिट पोलच्या निष्कर्षामुळे काँग्रेस महाराष्ट्र देखील अप बीट मूडमध्ये होती. लोकसभेचा अव्वल परफॉर्मन्स आणि त्या पाठोपाठ हरियाणा स्वबळावर जिंकल्याने काँग्रेसच्या बाहूंमध्ये मोठे बळ निर्माण झाले असते. त्याची छाप महाराष्ट्रातल्या जागावाटपावर पडून काँग्रेसने सहजपणे ठाकरे आणि पवारांना बॅकफूटवर ढकलले असते.

परंतु, प्रत्यक्षात काँग्रेसला हरियाणा स्वबळावर सत्ता मिळवता आली नाही आणि जम्मू-काश्मीरमध्ये जी सत्ता मिळाली, ती मित्र पक्षाच्या बळावर मिळाली, हे चित्र महाराष्ट्रात काँग्रेससाठी घातक ठरू शकते. जागावाटपाच्या चर्चेत आत्तापर्यंत बॅकफूटवर असलेले ठाकरे आणि पवार यानिमित्ताने काँग्रेसवर कुरघोडी करायची संधी घेतल्याशिवाय राहणार नाहीत, असे चित्र निर्माण झाले. याचे परिणाम याच्या दोन-तीन दिवसांत दसऱ्याच्या आसपास दिसणार आहेत.

हरियाणात काँग्रेसने मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर केला नाही. महाराष्ट्रात देखील मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करायला काँग्रेस आणि शरद पवारांचा विरोध आहे. पण उद्धव ठाकरेंची शिवसेना त्यासाठी आग्रही आहे. हरियाणातल्या काँग्रेसच्या पराभवानंतर उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याचा मुद्दा पुढे रेटायला नवे बळ मिळाले आहे.

Lost in haryana more damaging for Congress in maharashtra

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात