केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनीही शरद पवार यांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली आहे.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धाचा परिणाम संपूर्ण जगावर दिसून येत आहे. मध्यपूर्वेतील युद्धाने संपूर्ण जग दोन वेगवेगळ्या गटांमध्ये विभागले आहे. एक गट इस्रायलच्या पाठीशी उभा आहे, तर दुसरा हमासला पाठिंबा देत आहे. असेच काहीसे सध्या भारतीय राजकारणात घडत आहे. इस्रायलच्या समर्थन आणि विरोधाच्या राजकारणात राजकीय पक्ष एकमेकांवर कुरघोडी करत आहेत. याच पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी इस्रायलच्या पाठिंब्यावर आक्षेप घेतल्यानंतर आता आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी त्यांना प्रत्युत्तर दिले आहे. Looks like Supriya madam will be sent to Gaza to fight on behalf of Hamas Himanta Sarma targets Sharad Pawar
देशाचे माजी संरक्षणमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रॅेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल इस्रायल-हमासच्या मुद्द्यावर प्रतिक्रिया दिली होती आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भूमिकेवर टीका केली होती. याला प्रतिवाद करताना आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा म्हणाले की, ”शरद पवार आपली मुलगी सुप्रिया सुळे यांना हमाससाठी लढण्यासाठी गाझा येथे पाठवतील असे दिसत आहे.”
#WATCH | Delhi: On NCP chief Sharad Pawar's reported statement regarding India's stance on the Israel-Palestine conflict, Assam CM Himanta Biswa Sarma says, "I think Sharad Pawar will send Supriya (Sule) to Gaza to fight for the Hamas." pic.twitter.com/JrTWwIOM9T — ANI (@ANI) October 18, 2023
#WATCH | Delhi: On NCP chief Sharad Pawar's reported statement regarding India's stance on the Israel-Palestine conflict, Assam CM Himanta Biswa Sarma says, "I think Sharad Pawar will send Supriya (Sule) to Gaza to fight for the Hamas." pic.twitter.com/JrTWwIOM9T
— ANI (@ANI) October 18, 2023
तत्पूर्वी केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनीही शरद पवार यांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली आणि जगभरातील दहशतवादाचा निषेध करण्याची गरज व्यक्त केली. गोयल म्हणाले की, देशाच्या सुरक्षेच्या महत्त्वपूर्ण घटनांच्यावेळी शरद पवार यांनी सरकारमधील महत्त्वाच्या पदांवर काम केले होते, इस्रायलमधील दहशतवादी हल्ल्याबाबत भारताच्या भूमिकेवर शरद पवारांसारखे ज्येष्ठ नेते बेताल वक्तव्य करतात तेव्हा ते अतिशय अस्वस्थ करणारे आहे.
गोयल म्हणाले, ‘जगाच्या कोणत्याही भागात दहशतवादाच्या धोक्याचा सर्व प्रकारात निषेध केला पाहिजे. भारताचे संरक्षण मंत्री तसेच अनेकवेळा मुख्यमंत्री राहिलेल्या व्यक्तीचा दहशतवादाशी संबंधित मुद्द्यांवर असा अनौपचारिक दृष्टिकोन असणे हे दुःखद आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App